Sign Up

Sign Up to our social questions and Answers Engine to ask questions, answer people’s questions, and connect with other people.

Sign In

Login to our social questions & Answers Engine to ask questions answer people’s questions & connect with other people.

Forgot Password

Lost your password? Please enter your email address. You will receive a link and will create a new password via email.

Please briefly explain why you feel this question should be reported.

Please briefly explain why you feel this answer should be reported.

Please briefly explain why you feel this user should be reported.

MPSC GK Latest Articles

5 December 2022 Current Affairs in Marathi | 5 डिसेंबर 2022 Chalu Ghadamodi

5 December 2022 Current Affairs in Marathi | 5 डिसेंबर 2022 Chalu Ghadamodi

5 December 2022 Current Affairs in Marathi: आमच्या वेबसाईट वरील Daily current affairs in Marathi नियमित वाचून तुम्हाला MPSC, Police bharati, Talathi bharati, ZP bharati, Post Office Bharti, UPSC, SSC, IBPS, BANK PO, PSI, STI, ASO, यासारख्या सर्व सरकारी परीक्षांसाठी तयारी करायला मदत होईल.

1. गौतम अदानी फॉर्ब्स इंडियाच्या श्रीमंतांच्या यादीत 2022 मध्ये कितव्या स्थानावर आहेत?

A. दुसऱ्या
B. चौथ्या
C. पहिल्या
D. तिसऱ्या

गौतम अदानी (संपत्ती – $150 अब्ज)
मुकेश अंबानी ($88 अब्ज)
राधाकिशन दमानी ($27.6 अब्ज)
सायरस पुनावाला ($21.5 अब्ज)
शिव नाडर ($21.4 अब्ज)

2. भारताच्या पहिल्या G20 शेर्पा बैठकीचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले आहे?
A. दिल्ली
B. मुंबई
C. नाशिक
D. उदयपूर

भारताकडे G20 शेरपा बैठकीचे पहिल्यांदा अध्यक्ष पद आले आहे.

3. राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे?
A. शंकर सुब्रमण्यम
B. तय्यब इकराम
C. राजीव लक्ष्मण करंदीकर
D. अशोक कुमार

नॅशनल स्टॅटिस्टिकस कमिशन म्हणजे राष्ट्रीय सांख्यिकी आयोग होय. राष्ट्रीय सांख्यिकी दिवस हा 29 जून रोजी साजरा केला जातो.

अलीकडील 2022 मधील काही महत्वाच्या नियुक्त्या
50 वे CJI – डी वाय चंद्रचूड
BCCI चे अध्यक्ष – रॉजर बिन्नी
16 वे अटर्नि जनरल – आर व्यंकटरमनी
भारतीय स्पर्धा परीक्षा आयोग अध्यक्ष – संगीता वर्मा
CBSE अध्यक्षा – निधी छिबबर
25 वे मुख्य निवडणूक आयुक्त – राजीव कुमार
उपनिवडणूक आयुक्त – अजय भादू
ONGC अध्यक्ष – अरुनकुमार सिंग
15 वे राष्ट्रपती- द्रौपदी मुर्मु
14 वे उप राष्ट्रपती – जगदीश धनखर
27 वे CGA – भारती दास
नीती आयोग उपाध्यक्ष – सुमन बेरी
नीती आयोग सीईओ – परमेश्वरन अय्यर
ISRO – एस सोमनाथ
DRDO – डॉ समीर व्ही कामथ
ICC उपाध्यक्ष – इम्रान ख्वाजा

4. अलीकडेच झालेली विजय हजारे ट्रॉफी 2022 कोणी जिंकली आहे?

A. महाराष्ट्र
B. सौराष्ट्र
C. हरियाणा
D. रेल्वे

2022 विजय हजारे ट्रॉफी विषयी अधिक माहिती
सर्वात जास्त धावा – नारायण जगडीशन (तामिळनाडू)
सर्वात जास्त बळी – वासुकी कौशिक (कर्नाटक)
प्लेयर ऑफ टुर्नमेंट – ऋतुराज गायकवाड (महाराष्ट्र)
तामिळनाडू संघा ने सर्वाधिक वेळा म्हणजेच 5 वेळा विजय हजारे ट्रॉफी जिंकली आहे. तर त्यानंतर मुंबई संघाने 4 वेळा 2003, 2006, 2018 आणि 2020 या वर्षी विजय हजारे ट्रॉफी झिंकली आहे.
2022-23 ची विजय हजारे ट्रॉफी सौराष्ट्र संघाने महाराष्ट्र संघाला हरवून जिंकली आहे. ही स्पर्धा नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथी पार पडली.
2021-22 विजय हजारे ट्रॉफी संस्करण हे जयपूर येथील स्वामी मानसिंग स्टेडियम येथे झाले. ही ट्रॉफी हिमाचल प्रदेश संघाने तामिळनाडू संघाला हरवत जिंकली होती.
2020-21 विजय हजारे ट्रॉफी संस्करण हे अरुण जेटली स्टेडियम दिल्ली येथे पार पडले. मुंबई संघाने उत्तरप्रदेश संघाला हरवून ही ट्रॉफी जिंकली आहे.

क्रिकेट मधील इतर महत्वाचे कप आणि विजयी संघ

दुलीप कप 2021-22 : पश्चिम प्रदेश
रणजी कप 2022 : मध्यप्रदेश
अंडर 19 क्रिकेट विश्वचषक 2022 : भारत
आशिया कप 2022 : श्रीलंका
महिला आशिया कप 2022 : भारत
आयसीसी महिला विश्वचषक 2022 : ऑस्ट्रेलिया
दुरंड कप 2022 : बेंगलोर
संतोष कप 2022 : केरळ
थॉमस कप 2022 : भारत
उबेर कप 2022 : दक्षिण कोरिया
SAFF चॅम्पियनशीप 2021 : भारत
SAFF महिला चॅम्पियनशीप 2021 : बांगलादेश
आयपीएल 2022 : गुजरात टायटन्स
सुलतान जोहर कप 2022 : भारत

5. THE CHIPKO MOVEMENT : A PEOPLE’S HISTORY हे पुस्तक कोणाचे आहे?

A. शेखर पाठक
B. खालेद जावेद
C. शशी थरूर
D. पंडित कुमार

चिपको आंदोलन 1973 साली झाले होते. हे आंदोलन उत्तरप्रदेशात चमोली येथे सुरुवात झाली. उत्तराखंड मध्ये सध्या हे गाव आहे. चिपको आंदोलनाचे नेतृत्व हे सुंदर लाल बहुगुडा यांनी केले होते. चिपको आंदोलन झाडांच्या कापणीच्या विरोधात केलेले आंदोलन आहे.

6. भारताची कोणती योजना जगातील तिसरी सर्वात मोठी पीक विमा योजना ठरली आहे?
A. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना
B. प्रधानमंत्री जण धन योजना
C. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना
D. पंतप्रधान पीक विमा योजना

पीक अयशस्वी झाल्यास सर्वसमावेशक विमा संरक्षण प्रदान करते. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न स्थिर ठेवण्यास मदत होते. पंतप्रधान पीक विमा योजना 2016 साली सुरू करण्यात आली होती.

7. अलीकडेच संघ लोकसेवा आयोगाच्या सदस्य म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ कोणी घेतली आहे?

A. अलका उपाध्याय
B. रेखा शर्मा
C. प्रीती सुदान
D. सोमा मोंदल

8. कोणत्या राज्यात आंतरराष्ट्रीय लुसोफोन आयोजित केले होते?

A. पंजाब
B. गोवा
C. राजस्थान
D. गुजरात

परराष्ट्र मंत्रालय, भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद आणि गोवा सरकार यांच्या भागीदारीमध्ये आंतरराष्ट्रीय लुसोफोन आयोजित केले होते.

9. पॅरा स्पोर्टस पर्सन ऑफ द इयर हा पुरस्कार कोणाला भेटला आहे?

A. अवनी लेखरा
B. दीपा मलिक
C. देवेंद्र झंझरीया
D. सत्येंद्रसिंग लोहिया

10. डिसेंबर 2022 मध्ये सुदर्शन प्रहार व्यायाम कोठे आयोजित करण्यात आलेला होता?

A. महाराष्ट्र
B. गुजरात
C. तामिळनाडू
D. राजस्थान

भारतीय लष्कराने सुदर्शन प्रहार व्यायाम आयोजित केला होता.
भारत आणि इतर देशांमध्ये झालेले महत्वाचे सराव
खंजर 2022 – किर्गिझस्थान आणि भारत
संप्रीती आणि बॉंगोसागर – बांगलादेश आणि भारत
धर्मा गार्डीयन 2022 – जपान आणि भारत
DUSTLIK – उझबेकीस्तान आणि भारत
लमीतये सराव 2022 – सेशेल्स आणि भारत
वरुणा, गरुडा – फ्रांस आणि भारत
खान क्वेस्ट 2022- मंगोलिया आणि भारत
ईस्टर्न ब्रिज VI आणि नसीम अल बहर – ओमान आणि भारत
SLINEX सराव – श्रीलंका आणि भारत
टायगर ट्रम्प – अमेरिका आणि भारत
VINBEX – व्हिएतनाम आणि भारत
SIMBEX – सिंगापूर आणि भारत
IMT TRILAT – भारत मोजामबीक टांझानिया
मलबार – जपान भारत अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया
गरुडा शक्ती – भारत आणि ऑस्ट्रेलिया
ऑस्ट्रा हिंद – ऑस्ट्रेलिया आणि भारत

11. अडव्हरटायझिंग एजन्सीज असोसिएशन ऑफ इंडिया वै नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे?

A. अशोक लवासा
B. नवीन सरदेसाई
C. प्रशांत कुमार
D. यापैकी नाही

12. अलीकडेच मेरियम वेबस्टर ने 2022 साठी वर्षातील कोणता शब्द घोषित केला आहे?

A. HOMER
B. GASLIGHTING
C. PERMACRISIS
D. यापैकी नाही

Homer हा शब्द Cambridge युनिव्हर्सिटी ने वर्ड ऑफ द इयर म्हणून जाहीर केलेला आहे. Permacrisis हा शब्द collins dictionary ने वर्ड ऑफ द इयर म्हणून जाहीर केला आहे.

13. कोणत्या देशाचा ग्रेट बॅरियर रिफ जागतिक वारसा जागा म्हणून सुचिबद्ध केला जाईल?

A. ऑस्ट्रेलिया
B. जपान
C. रशिया
D. इंडोनेशिया

तर विध्यार्थी मित्रांनो मला आशा आहे हे 5 December Current Affairs in Marathi चे प्रश्न आणि उत्तरे वाचून तुमच्या ज्ञानात थोडी भर पडली असेल.

तुम्हाला जर का हा Chalu Chadamodi चा आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा. अशाच daily current affairs in Marathi Questions and answers साठी आमच्या वेबसाईट ला नियमित visit करा.

Related Posts

Leave a comment

You must login to add a new comment.