Tahsildar Information In Marathi | Tahsildar Marathi Mahiti

Tahasildar Information In Marathi | Tahsildar Marathi Mahiti

Tahasildar Information In Marathi: मित्रांनो आजच्या या Tahsildar Marathi Mahiti च्या लेखात मी तुम्हाला तहसीलदार या पदाविषयी संपूर्ण माहिती सांगणार आहे. आजच्या या लेखात या पदाची निवड कशाप्रकारे होते? तुमची शैक्षणिक पात्रता काय असेल हवी? त्यानंतर तुमचे प्रमोशन कशा प्रकारे होतो? कोणत्या जिल्ह्यांमध्ये तुम्हाला काम करावं लागेल? काम कोणती करावी लागतात? कोणती कर्तव्ये तहसीलदार या पदाला पार पाडावी लागतात? याबाबत संपूर्ण सविस्तररीत्या माहिती सांगणार आहे. हा लेख वाचल्यानंतर तुम्हाला या पदाविषयी कोणती हि शंका राहणार नाही.

तहसीलदार कसे बनायचे? । How to become Tahsildar in Marathi

तर विद्यार्थीमित्रांनो तहसीलदार हे जे पद आहे. ते गट अ म्हणजे क्लास वन चे पद आहे आणि तहसीलदार होण्याकरीता तुम्हाला एमपीएससी(Maharashtra Public Service Commission) परीक्षा द्यावी लागते. म्हणजेच राज्यसेवा. MPSC  प्रक्रियेद्वारे राज्यसेवा परीक्षा घेतली जाते ती तुम्हाला द्यावी लागेल ती परीक्षा एकूण 30 पदाकरिता होत असते. त्यामध्ये तहसीलदार हे एक पदअसते.

तहसीलदार होण्याकरिता तुम्ही दोन प्रक्रियेतून तहसीलदार होऊ शकता. तुम्ही जर आता नायब तहसिलदार असाल तर तुमचं ८ ते 10 वर्षानंतर तहसीलदार या पदावरती प्रमोशन होउ शकतो आणि दुसरी प्रक्रिया म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत एक राज्यसेवा परीक्षा घेतली जाते. या परीक्षेद्वारे तुम्ही तहसिलदार होऊ शकता.

मग ती परीक्षा नक्की कोणती आहे आणि कशाप्रकारे तुमची निवड होते ते मी तुम्हाला सविस्तर सांगतो. तर मित्रांनो ही जी परीक्षा आहे त्या परीक्षेमध्ये तहसीलदार हे एक पद त्याठिकाणी गट अ च पद आहे. राजपत्रित पद आहे आणि तहसीलदार जर तुम्ही झाले तर तहसीलदार झाल्यानंतर तुमचा प्रमोशन हे उपजिल्हाधिकारी पदावर देखील होऊ शकते. तर लक्षात ठेवा तहसीलदार हा उपजिल्हाधिकारी या पदावर देखील प्रमोशनने जाऊ शकता.

राज्यसेवा परीक्षेबद्दल माहिती द्यायची झाली तर या परीक्षेचे तीन टप्पे तुम्हाला पार पाडावी लागतील ते कोणते तर,

  • पूर्व परीक्षा
  • मुख्य परीक्षा
  • मुलाखत.

या ठिकाणी तुमची शारीरिक पात्रता वगैरे नसली तरीही चालेल. कारण इथे दिव्यांग देखील फॉर्म भरू शकतात त्यामुळे काळजी करायची गरज नाही. तुमचा ग्राउंड वगैरे काही या ठिकाणी होत नसते. पूर्व परीक्षा तुम्हाला पास करायची आहे. पूर्व परीक्षेनंतर मुख्य परीक्षेचा टप्पा असतो आणि मुख्य परीक्षा झाले कि असते मुलाखत आणि मग तुमची कोणत्याही जिल्ह्यांमध्ये नियुक्ती जाहीर केली जाते.

वयोमर्यादा किती असायला हवी? । Age limit for tahsildar in Marathi

परीक्षा तर आपण देणार आहोत ज्यामध्ये पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखती हे तीन टप्पे आहेत. पण वयोमर्यादा नक्की परीक्षेकरीता काय असेल? तर बघा तहसीलदार होण्यासाठी उमेदवारांचे वय किमान 21 वर्षे आणि कमाल 42 वर्षे असावे. आणि सर्व एससी, एसटी, ओबीसी, जनरल प्रवर्गासाठी वयोमर्यादा जी आहे ती वेगवेगळी ठेवण्यात आलेली आहे आणि एससी, एसटी आणि ओबीसी प्रवर्गा नियमानुसार वयात सवलत देखील देण्यात आली आहे. पण कमाल वय 21 आणि कमाल वय 42 तुमचं असायला हवं.

शैक्षणिक पात्रता | Tahsildar Information In Marathi

मग परीक्षा देण्याकरिता तुमची शैक्षणिक पात्रता काय असेल?

तर मित्रांनो तुमच्याकडे पदवी असणं गरजेचं आहे. मग पदवी तुम्ही कोणत्याही फिल्डमधून घ्या. तुम्ही बी फार्मसी केली असेल, बी एस्सी केली असेल, बी ए ची पदवी तुमच्या कडे असेल तरीही काही हरकत नाही. तुम्ही एमबीए झालेले असाल, तुम्ही इलेक्ट्रिकल इंजिनिअर वगैरे असाल तरीही काही हरकत नाही.  तुमहाला एखादा वर्ष ड्रॉप लागला असेल किव्हा  एखाद्या वर्षी तुम्हाला back किव्हा KT असेल व त्यामुळे एखाद्या वर्षी तुम्ही रिपिट बसलेले असाल तरीही काही हरकत नाही, तुम्ही हि परीक्षा देऊ शकता. फक्त तुमच्याकडे ग्रॅजुएशन चे सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे. जर तुमच्याकडे या मधील कोणतेही सर्टिफिकेट असेल तर तुम्ही 100 टक्के तहसीलदार या पदांकरीता जी होणारी परीक्षा आहे ती देऊ शकता. आणि मित्रांनो, तहसील झाल्यानंतर तुम्हाला उपजिल्हाधिकारी हे पद देखील प्रमोशनद्वारे मिळू शकतो हेही विसरायला नको.

तहसीलदार या पदाचे वेतन किती असेल? । Tahsildar salary information in Marathi

आता तुम्ही पूर्व परीक्षा दिली, मुख्य परीक्षा दिली तुमची मुलाखतही झाली आणि कोणत्या तरी जिल्ह्याच्या ठिकाणी तुमची नियुक्ती करण्यात आली तर मग तुमचं वेतन किती असेल तर बघा या पदाचे वेतन जे आहे ते एका अधिकृत वेबसाईटनुसार रुपये 55,100 ते 1,75,100 एवढा असू शकते असा अंदाज आहे. त्यानंतर महानगरामधील मासिक वेतन रुपया 77,111 असू शकते आणि जिल्ह्याच्या ठिकाणी अंदाजे 73,283 आणि दरवर्षी वेतनवाढ महागाई भत्ता मिळून 4000 रुपयांनी तुमचे वेतन वाढ होत असते . दरवर्षी वेतनवाढ आणि महागाई भत्ता मिळून ₹4000 वेतनवाढ दरवर्षी होत असते. त्यानंतर तुमची नियुक्ती झाली. मग तुम्हाला कोणती करावे लागतील?.

तहसीलदार काय काम करतात? | Tahsildar work in marathi

तहसीलदाराला कोणती कामे करावी लागतात ?

  • तर जमिनीशी संबंधित कामे व त्यासंबंधीचे वाद ऐकून त्यांचे निराकरण करणे.
  • पटवारीने केलेल्या कामावर देखरेख करणे.
  • जमिनीच्या नोंदीशी संबंधित अनेक प्रकारची कामे तहसीलदार जो आहे तो करत असतो. शेतकऱ्यांना जमिनीची माहिती कोणतीही अडचण येऊ नये याची काळजी तो घेत असतो.
  • जात प्रमाणपत्र असेल, राहिवासी दाखला असेल, उत्पन्नाचा दाखला असेल ,आदी महत्त्वाची कागदपत्रे तहसीलदारांच्या स्वाक्षरीनंतरच  वैध ठरतात.
  • जात प्रमाणपत्र, राहिवासी दाखल आणि उत्पन्नाचा दाखला जेव्हा आपण काढतो त्यावर देखील तहसीलदाराची सिग्नेचर असते.
  • त्यानंतर पीक संबंधी कोणत्याही प्रकारच्या नुकसानीची भरपाई तहसीलदाराद्वारे प्रतिबंधित केल्या जातात.
  • याशिवाय त्यांना अनेक प्रकारची कामे करावी लागतात आणि त्यासोबतच त्याच्याकडे अनेक प्रकारच्या शक्ती असतात आणि ते त्यांच्या आवश्यकतेनुसार वापर देखील करू शकतात.

शासनाच्या तहसीलचा तहसीलदार नक्की कोण असतो?

तर मित्रांनो शासनाच्या तहसिलीचा प्रमुख अधिकारी तो असतो. तहसील म्हणजे काय तर वसूल. त्यामुळे तहसीलदार म्हणजे ग्रामीण जनतेकडून कर वसूल करणारा अधिकारी. ग्रामीण म्हणण्याचा उद्देश असा की इतर प्रकारच्या जनतेकडून कर वसूल करण्यासाठी अन्य अधिकारी असतात, पण जिल्ह्याच्या तुकड्याला आपण मराठीत तालुका म्हणतो तर हिन्दीत तहसील असे म्हणतात. त्यामुळे तहसीलदार हा तालुक्याचा सर्वोच्च नागरी अधिकारी असतो.

तर आजच्या या लेखात मी तुमहाला सविस्तर माहिती सांगितली आहे, या मध्ये आपण तहसीलदारांची कामे काय असतात ते आपण बघितले, तुमची वयोमर्यादा काय असावी, तुमच्याकडे शैक्षणिक पात्रता तुमची काय असेल हवी? पदवी असणं गरजेचं आहे. कोणतेही फिल्डमधून तुम्ही पदवी घेतली असेल तरी काही हरकत नाही.

त्यानंतर. परीक्षा जी आहे ती राज्यसेवा मुख्य पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत हे तीन तुम्हाला टप्पे पार करावे लागतील. त्यानंतर तुमची नियुक्ती होते. त्यानंतर आपण वेतन देखील बघितलेला आहे. तुमचा वेतन किती असेल? दरवर्षी किती वाढतात? तुमचे प्रोमोशन कधी व कसे होते या बद्दल सर्व माहिती मी तुम्हाला आजच्या या लेखात दिलेली आहे.

Final Words

Tahsildar Information In Marathi या लेखात दिलेल्या माहितीबद्दल तुम्हाला कोणत्याही प्रकारची शंका असेल तर खाली कंमेंट करून नक्की सांगा. मी लवकरात लवकर तुमच्या शंकांचे निरसन करेन.

हे देखील वाचा: 

MPSC Previous Year Question Paper

Maharashtra police Bharti Sarav Paper

Birthday wishes for wife in Hindi

नमस्कार विद्यार्थीमित्रांनो, मी सायली जोशी तुमचं माझ्या वेबसाईटवर स्वागत करीत आहे. मी माझ्या वेबसाईट वर एमपीएससी आणि इतर महाराष्ट्रातील होणाऱ्या स्पर्धा परीक्षा संबंधीची माहिती नियमितपणे शेअर करत असते. मी एम ए केलेला आहे. मला पाच वर्षाचा ऑनलाइन टिचिंग चा अनुभव आहे. आणि माझ्या या वेबसाईटच्या मार्फत मी मला असलेली माहिती तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न करत आहे.

Leave a Comment