हंगामी पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतो?

A. जिल्हाधिकारी
B. प्रांताधिकारी
C. तहसीलदार
D. विस्तार अधिकारी
Who appoints a temporary police patil?

1 Answer on “हंगामी पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतो?”

  1. तहसीलदार
    मुंबई नागरी कायदा (बॉम्बे सिव्हील अॅक्ट), १८५७ नुसार राज्यात पोलिस पाटील हे पद निर्माण करण्यात आले. महाराष्ट्र मुलकी पोलिस अधिनियम, १९६२ अन्वये १ जानेवारी १९६२ पासून राज्यातील वंशपरंपरागत मुलकी पद रद्द झाले. महाराष्ट्र ग्राम पोलिस अधिनियम, १९६७ नुसार पोलिस पाटलाची नियुक्ती केली जाते. राज्य सरकार, जिल्हाधिकारी वा त्यांनी अधिकार प्रदान केल्यास उपजिल्हाधिकारी किंवा प्रांत या अधिकाऱ्यांमार्फत पोलीस पाटलाची नियुक्ती करते. हंगामी पोलिस पाटलाची तात्पुरती नेमणूक करण्याचे अधिकार तहसीलदारास आहेत.

Leave a Comment