‘मराठी सत्तेचा उदय’ हे पुस्तक कोणी लिहिले ?

A. वि. दा. सावरकर
B. न्या. मा. गो. रानडे महादेव गोविंद रानडे
C. बा. गं. टिळक
D. ज्योतिबा फुले

Who wrote the book ‘Rise of Marathi Power’?

1 thought on “‘मराठी सत्तेचा उदय’ हे पुस्तक कोणी लिहिले ?”

  1. न्या. मा. गो. रानडे महादेव गोविंद रानडे
    पुस्तकाचे नाव ‘मराठी सत्तेचा उत्कर्ष’ असे नसून ‘मराठयांचा सत्तेचा उत्कर्ष’ असे आहे. न्या. माधव गोविंद रानडे यांनी लिहिलेल्या ‘Rise of Maratha Power’ या इंग्लिश ग्रंथाचा हा मराठी अनुवाद आहे.

    ग्रँट डफ याने मराठयांचा इतिहास लेखनाचा पाया घातला. पण त्याच्या निष्कर्षांबद्दल अनेक मतभेद आहेत. त्याने असा निष्कर्ष काढला होता की, ‘मराठयांची सत्ता म्हणजे एखादा वणवा पेटावा आणि विझून जावा, अशा तऱ्हेची होती, तिला काही आगापिछा नव्हता.’ न्या. रानडे यांनी आपल्या ग्रंथात तो निष्कर्ष सप्रमाण खोडून काढला. मराठयांचा इतिहासाचे महत्व काय, मराठेशाहीला अनुकूल पार्श्वभूमी कशी तयार झाली, याचे विवेचन त्यांनी या ग्रंथात केले आहे. या प्रकारचा मराठयांचा इतिहासावरील हा पहिला ग्रंथ होता.

Leave a Comment