कोणत्या राज्याला देवभूमी या नावाने सुद्धा ओळखले जाते?

A. हरियाणा
B. पंजाब
C. उत्तराखंड
D. उडीसा

Which state is also known as Devbhumi?

1 thought on “कोणत्या राज्याला देवभूमी या नावाने सुद्धा ओळखले जाते?”

  1. उत्तराखंड
    भारतातील उत्तराखंड या राज्याला देवभूमी असे म्हणतात या राज्याला वैदिक काळाचा इतिहास आहे बारा ज्योतिर्लिंगांपैकी महत्त्वाचे असे केदारनाथ याच ठिकाणी आहे.त्याच प्रमाणे हिंदू धर्मातील चार धामांपैकी विष्णूंचे बद्रीनाथ धाम यात राज्यातआहे जो जाये बद्री, कभी ना आये उदरी, असे म्हटले जाते.दर बारा वर्षांनी भरणाऱ्या कुंभमेळा हरिद्वार या ठिकाणी होतो.तसेच ऋषिकेश सारखे पवित्र ठिकाण याच राज्यात आहे. हिंदु धर्मातील पवित्र अशा गंगा यमुना यांचे उगमस्थान स्थान याच ठिकाणी गंगोत्री आणि यमुनोत्री म्हणून प्रसिद्ध आहे तसेच अलकनंदा, मंदाकिनी, भागीरथी ह्या नद्या. याच राज्यातून वाहतात. या राज्याची सीमा तिबेट आणि नेपाळ ला लागून आहे. तिबेटच्या पठारावरती हे राज्य वसले आहे आहे.
    उत्तर प्रदेश चे विभाजन होऊन उत्तराखंड अस्तित्वात आले.त्याचप्रमाणे श्री अगस्ती ऋषींची तपोभूमी रुद्रप्रयाग याच ठिकाणी आहे.रामायणात सीता मातेने भूमातेला आपल्या पोटात सामावून घेण्याची विनंती केली. त्यावेळी भूमी दुभंगली व सीता माता तिच्या पोटात गायब झाली. ते ठिकाण मनसार म्हणून या राज्यात आहे. म्हणून आयुष्यात एकदा तरी उत्तराखंडला भेट द्यायलाच हवी. हे धार्मिक ठिकाण आहेच पण पर्यटनासाठी ही उत्कृष्ट आहेत.

Leave a Comment