MPSC Science Questions in Marathi 2024
प्रत्येक परीक्षेत 2 ते 4 प्रश्न विज्ञानावर विचारले जातात. विज्ञानातील मानवी घटकावर सर्वाधिक प्रश्न येत असतात. पाठ्यपुस्तकांचा व्यवस्थित अभ्यास, जुने प्रश्न सोडवणे, प्रश्नांचे विश्लेषण करणे यातून जास्तीत जास्त गुण मिळवता येतात. आजच्या या लेखात मी तुमच्या साठी घेऊन आलो आहे मागील वर्षी विचारले गेलेले MPSC Science Questions in Marathi.
Q. वाफेच्या इंजिनाचा शोध कोणी लावला ?
1) अलबर्ट आईनस्टाईन
2) जेम्स वॅट
3) थॉमस एडिसन
4) न्यूटन
स्पष्टीकरण
- जेम्स वॅट यांनी वाफेच्या इंजिनाचा शोध लावला.
- वाफेच्या इंजिनावर पाहिल्यांदा रेल्वे धावली.
संशोधक – संशोधन
- जेम्स वॅट: वाफेचे इंजिन
- न्यूटन: गतीचा नियम, प्रिझम
- थॉमस एडिसन: बल्च
- अल्बर्ट आईनस्टाईन: सापेक्षवादाचा सिद्धांत
- डिझेल: डिझेल इंजिन
Q. आल्फ्रेड नोबेल यांनी कशाचा शोध लावला?
1) डायनामाईट
2) लसीकरण
3) नोबेल पुरस्कार
4) जलविद्युत
स्पष्टीकरण
- आल्फ्रेड नोबेल यांच्या भावाचा स्फोटकांच्या अपघातात मृत्यू झाला, म्हणून सुरक्षित स्फोटके शोधण्यावर त्यांनी लक्ष दिले व डायनामाईटचा शोध लावला.
- डायनामाईटचा उपयोग विहीर खोदताना, खाणकाम करताना, स्फोट घडवून आणण्यासाठी केला जातो.
- आल्फ्रेड नोबेल यांच्या नावे नोबेल पुरस्कार दिला जातो.
- नोबेल पुररस्कार 6 क्षेत्रातील जिवंत व्यक्तींना दिला जातो.
Q. सेफ्टी लॅम्पचा शोध खालीलपैकी कोणी लावला ?
1) थॉमसन
2) एडिसन
3) जेम्स वॅट
4) हंफ्रे डेव्हीड
स्पष्टीकरण
- एडिसन – विद्युत बल्बचा शोध लावला.
- जेम्स वॅट वाफेच्या इंजिनाचा शोध.
- थॉमसन इलेक्ट्रॉनचा शोध.
- रुदरफोर्ड – अणुकेंद्रकाचा शोध.
Q. खालीलपैकी कोणत्या साधनाने हृदयाचे ठोके मोजले जातात?
1) कार्डीओग्राफ
2) स्टेथोस्कोप
3) थर्मोमीटर
4) अल्टी मीटर
स्पष्टीकरण
- थर्मोमीटर तापमान मोजण्यासाठी
- कार्डीओग्राम हृदया संबंधित चाचणी
- अल्टीमीटर – समुद्रसपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी
Q. रिव्हॉल्व्हरचा शोध कोणी लावला ?
1) एके
2) कोल्ट
3) फेरडे
4) नोबल
स्पष्टीकरण
- रिव्हॉल्व्हरचा (लहान बंदूक) शोथ सॅम्युल कॉल्ट याने लावला.
- 100 ते 200 मीटरवरील निशान्यासाठीची 5 ते 10 गोळ्या बंदुकीत असतात.
Q. अंतराळ प्रवेश करणारा पहिला भारतीय कोण?
1) कल्पना चावला
2) राकेश शर्मा
3) समीर शर्मा
4) नील आर्मस्ट्रॉग
स्पष्टीकरण
- 2 एप्रिल 1984 रोजी भारत-रशिया अवकाश संशोधन संस्था कार्यक्रमांतर्गत रशियाच्या सोयुझ टी-11 यांनातून प्रवास.
- राकेश शर्मा पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी अंतराळातून बोलत होते. “अंतराळातून भारत कसा दिसतो?” या प्रश्नाला त्यांनी “सारे जहाँ से अच्छा हिंदोस्तों हमारा” असे उत्तर दिले.
- सन्मान- अशोक चक्र
Q. भटनागर पुरस्कार हा कोणत्या क्षेत्रात दिला जातो?
1) चित्रपट
2) शेती
3) विज्ञान
4) साहित्य
स्पष्टीकरण
क्षेत्र – पुरस्कार
- चित्रपट: दादासाहेब फाळके पुरस्कार
- कृषी: बोरलॉग पुरस्कार
- साहित्य: ज्ञानपीठ पुरस्कार
- विज्ञान: भटनागर पुरस्कार
Q. In Vitro Fertitization (IVF) म्हणजे टेस्ट ट्यूब बेबीचा जनक कोण?
1) स्टिफन हॉकिंग
2) रॉबर्ट एडवर्डस
3) पेंट्रिक स्टेण्टोई
4) डॉ. हरगोविंद खुराणा
स्पष्टीकरण
- टेस्ट ट्यूब बेबी (IVF) प्रक्रियेमध्ये स्त्रीबीज आणि शुक्राणू योग्य वेळी कलेक्ट केले जातात आणि अॅडव्हान्सड लॅब मधील इन्क्युबेटर्स मध्ये फर्टीलाइज केले जातात. यावेळी तयार केलेला भ्रूण/एम्ब्रियो स्त्रीच्या गर्भाशयात ट्रान्स्फर केला जातो. या प्रक्रियेत बाळाचा पुढील विकास आणि वाढ अगदी नैसर्गिक रीतीने होतो. या संपूर्ण प्रक्रियेतून जन्मलेल्या बाळाला टेस्ट ट्यूब बेबी म्हणतात.
- टेस्ट ट्यूब बेबीचा जनक रॉबर्ट एडवर्ड्स आहे.
- जगातील पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीचा जन्म 25 जुलै 1978 रोजी इंग्लंडमध्ये झाला.
- भारतातील पहिली टेस्ट ट्यूब बेबी कनुप्रिया अग्रवाल
- भारतातील पहिले टेस्ट ट्यूब बेबी जनक डॉ. सुभाष मुखर्जी.
Q. टॉक्सिकॉलॉजी हे कशाशी संबंधित शास आहे?
1) चामडे व त्वचा
2) अनुवंशिकता
3) विष
4) यापैकी नाही
स्पष्टीकरण
- चामडे व त्वचा यासाठी डरमॅटॉलॉजी (Dermatology) शास आहे.
- अनुवंशिकता यासाठी इनहेरिटन्स (Inheritance) म्हणतात.
- विषाविषयी अभ्यास म्हणजे टॉक्सिकॉलॉजी होय.
Q. हेलिकॉप्टरचा शोध………….. शास्त्रज्ञाने लावला.
1) एडिसन
2) जेम्स वॅट
3) जॉन वॉकर
4) सिकोर्स्की
स्पष्टीकरण
- एडिसन या शास्त्रज्ञाने लाइटचा (विजेचा बल्ब) शोध लावला.
- जेम्स वॅट यांनी वाफेच्या इंजिनचा शोध लावला.
- ऑन वॉकर यांनी फ्रिक्शन लाइटचा शोध लावला.
- राईट बंधूनी विमानाचा शोध लावला.
Q. ………… यांनी रक्तभिसरणाचा महत्त्वपूर्ण शोध लावला.
1) डॉ. हॅन्सन
2) डॉ. विल्यम हार्वे
3) साल्क
4) फेडरिक बेटिंग
स्पष्टीकरण
- साल्क यांनी पोलिओवरील लस शोधली. (इंजेक्शनद्वारे)
- फेडरिक बेटिंग यांनी इन्सुलिनचा शोध लावला.
- विल्यम हार्वे यांनी रक्ताभिसरणाचा शोथ लावला.
- हॅन्सन यांनी कुष्ठरोग (Leprocy) शोधला.
सामान्य विज्ञान प्रश्न आणि उत्तरे
Q. केंद्रीय कृषी व कुटुंब कल्याण मंत्रालयाने कोणता दिवस ‘शेतकरी महिला दिवस’ म्हणून घोषित केला?
1) 10 ऑक्टोबर
2) 20 ऑक्टोबर
3) 15 ऑक्टोबर
4) 25 ऑक्टोबर
स्पष्टीकरण
- 10 ऑक्टोबर – जागतिक मानसिक आरोग्य दिन
- 20 ऑक्टोबर – जागतिक सांख्यिकी दिवस
- 25 सप्टेंबर-जागतिक औषधनिर्मिती दिन
Q. वैद्यकशास्राचे जनक कोणास म्हटले जाते?
1) अपोलो
2) प्लुटो
3) एपिडरस
4) हिप्पोक्रेटस
स्पष्टीकरण
- प्लेटो हे तत्त्वज्ञानाचे जनक असून त्यांनी ‘द अकॅडेमी’ चालू केली.
- अपोलो यांना संगीत, नृत्य व धनुर्विद्येची देवता मानले जाते.
Q. ………..या इटालियन शास्त्रज्ञाने दुर्बिणीचा शोध लावला.
1) ऑन केपलर
2) कोपर्निकस
3) गॅलिलिओ
4) न्यूटन
स्पष्टीकरण
- जॉन केपलर यांनी ग्रहांच्या हालचालीचे नियम शोथले.
- कोपर्निकस यांनी सूर्य हा ग्रहमालेचा केंद्रबिंदू असून पृथ्वी व इतर ग्रह सूर्याभोवती फिरतात असे सांगितले.
- न्यूटन यांनी गतिविषयक 3 नियम मांडले.
- गॅलिलिओचे शोध- खगोलशास्त्रीय दुर्बीण, गुरु ग्रहाचे उपग्रह, लंबकाचे घड्याळ, तापमापी
Q. 1953 मध्ये डीएनए ची प्रतिकृती कोणत्या संशोधकाने तयार केली?
1) वॅटसन
2) क्रिक
3) मिशर
4) 1 व 2 दोन्ही
स्पष्टीकरण
- वॅटसन व क्रिक यांनी डबल हेलिक्स डीएनएची प्रतिकृती तयार केली.
- मिशर 1869 मध्ये यांनी रेणू शोधून काढला. ज्याला आपण DNA म्हणून संदर्भ घेतो.
Q. अॅटिरेबीजच्या शोधाचे जनक कोण आहेत?
1) एडवर्ड जेन्नर
2) लुई पाक्षर
3) डॉ. हॅन्सन
4) अलेक्झांडर फ्लेमिंग
स्पष्टीकरण
- लुई पाश्चर यांनी ऑटरेबीजचा शोध लावला एडवर्ड जेन्नर यांनी देवी या रोगावर लस शोधून काढली.
- लुई पाश्चर यांनी अॅथ्रेक्स, रेबीज, कॉलेरा या रोगांवरील लसी शोधल्या.
- त्यांना सूक्ष्मजीवशास्राचे (Microbiology) जनक असे म्हणतात.
- अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी पेनिसिलिनचा शोध लावला.
Q. होमिओपॅथीचा जनक कोण?
1) चार्ल्स डार्विन
2) हिप्पोक्रेटस
3) लुई पाश्चर
4) सर हेनीमन
स्पष्टीकरण
- अॅलोपॅथीचा जनक हिप्पोक्रेटस् हे आहेत.
- लुई पाश्चर यांनी अँटिबेरीजचा शोध लावला.
- चार्ल्स डार्विन यांनी मानवी उत्क्रांतीवादाचा शोध लावला.
- आयुर्वेदाचे जनक चरक
Q. सन 1590 मध्ये थर्मामीटरचा शोध कोणी लावला ?
1) थॉमस सॅव्हरी
2) राईट बंधू
3) गॅलिलिओ
4) कोल्ट
स्पष्टीकरण
- थर्मामीटरचा वापर तापमान मोजण्यासाठी करतात व तापमानासाठी डिग्री सेल्सिअस या एककाचा वापर करतात.
- राईट बंधूंनी विमानाचा शोथ लावला.
- कोल्ट यांनी बंदुकीचा शोध लावला.
- थॉमस सेल्व्हरी यांनी वाफेच्या पंपाचा शोध लावला.
Q. रेफ्रिजरेटरचा शोध कोणी लावला?
1) टेलर व यंत्र
2) पार्किन्स
3) सिकोस्र्की
4) कोल्ट
स्पष्टीकरण
- रेफ्रिजरेटरचा वापर पदार्थ थंड करण्यासाठी वापरतात.
- जॅकोब पार्किन्स यांनी रेफ्रिजरेटरचा शोध लावला.
- ए.सी.चा शोथ विलीस हेविलंड करियर यांनी लावला.
- सॅम्युयल कोल्ट यांनी बंदुकीचा शोध लावला.
Q. क्षयाच्या जंतूंचा शोध कोणी लावला ?
1) बेल लुईस
2) एडवर्ड जेन्नर
3) चंडविक
4) कॉक
स्पष्टीकरण
- बेल लुईस यांनी प्रिन्सिपल ऑफ वॉक्सिन शोधले.
- चॅडविक यांनी न्यूट्रॉनचे अस्तित्व शोधले.
- रॉबर्ट कॉकने क्षयाचे जंतू (TB) शोधले.
Science General knowledge Questions in Marathi
Q. सूक्ष्मदर्शक चे इंग्रजी नाव खालीलपैकी कोणते आहे?
1) मायक्रोमीटर
2) मायक्रोस्कोप
3) फोटोमीटर
4) कॅलिडोस्कोप
स्पष्टीकरण
- मायक्रोमीटर हे लांबीचे एकक आहे.
- फोटोमीटर हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन मोजण्यासाठी वापरतात.
- कॅलिडोस्कोप हे मनोरंजनाची खेळणी बनवण्यासाठी वापरतात.
- लिव्हॅन हाँक यांनी सूक्ष्मदर्शीचा (Microscope) शोध लावला.
Q. DNA चा शोध कोणी लावला ?
1) लुई पाश्चर
2) फ्रेड्रिक मिशर
3) लिव्हॅन हाँक
4) एडिसन
स्पष्टीकरण
- वॉटसन आणि क्रिक यांनी DNA रचना शोधून काढली.
- लिव्हन हाँक यांनी मायक्रोस्कोप शोधून काढला.
Q. रक्तगटाचा शोध कोणी लावला ?
1) फुल्क
3) विल्यम हार्वे
2) स्टेड
4) लँडस्टायनर
स्पष्टीकरण
- सी. फुंक यांनी जीवनसत्त्व शोधून काढले.
- विल्यम हार्वे हे शरीरशास्राचे जनक मानले जातात.
Q. क्रिस्ट्रोलोग्राफी ही कोणत्या विषयाच्या अभ्यासाशी संबंधित आहे?
1) धातुंचा अभ्यास
2) स्फटिकांचा अभ्यास
3) ऊतीचा अभ्यास
4) मज्जासंस्थेचा अभ्यास
स्पष्टीकरण
- धातूंच्या अभ्यासाला धातूशास्र म्हणतात. (मेटालर्जी)
- उतींच्या अभ्यासाला हिस्टॉलॉजी म्हणतात.
- मञ्जासंस्थेच्या अभ्यासाला न्यूरॉलॉजी म्हणतात.
Q. इक्रिसॅट तंत्रज्ञान खालीलपैकी कोणत्या पिकासाठी वापरले जाते?
1) ज्वारी
2) भुईमूग
3 ) ऊस
4) सोयाबीन
स्पष्टीकरण
- डॉ. पाँग भात लागवडीसाठी.
Q. ग्रामोफोनचा शोध कोणी लावला ?
1) एडिसन
2) मार्कोनी
3) ग्रॅहम बेल
4) यापैकी नाही
स्पष्टीकरण
- ग्रामोफोन स्वतःच्या अक्षाभोवती फिरत असलेल्या ध्वनिमुद्रित तबकडीवरील घळीतून सरकणाऱ्या सुईच्या किंवा सुचिकेच्या कंपनांचे यांत्रिक अगर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने कंपनक्षम पडद्यापर्यंत प्रेषण करून ध्वनीची पुननिर्मिती करणारे यंत्र.
- रेडिओचा शोथ – मार्कोनी
- टेलिफोनचा शोथ – ग्रॅहम बेल
Q. कीटकांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रास म्हणतात.
1) पॅथॉलॉजी
2) अॅनॉटॉमी
3) एन्टोमॉलॉजी
4) अर्नियॉलॉजी
स्पष्टीकरण
- अॅनॉटॉमी म्हणजे संपूर्ण शरीराचा अभ्यास.
- पॅथॉलॉजी म्हणजे रोगांचा अभ्यास.
- ऑर्निथॉलॉजी म्हणजे पक्ष्यांचा अभ्यास.
Q. वनस्पतींमधील जीवाचा शोध कोणी लावला ?
1) जे. सी. बोस
2) डॉ. हरगोविंद खुराणा
3) डॉ. जेन्स सिम्सन
4) डॉ. बिरबल सहानी
स्पष्टीकरण
- डॉ. हरगोविंद खुराणा हे पहिले शास्त्रज्ञ होते. ज्यांनी न्यूक्लिओटाईडच्या प्रोटिन सिंथेसिस मधला सेल शोधला.
- जीवाणूचा शोथ लिवेन हुक यांनी लावला.
- डॉ. बिरबल सहानी जिवंत जीवाश्म यांबद्दल माहिती दिली.
Q. खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे?
अ) अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी 1928 मध्ये पेनिसिलीन हे पहिले प्रतिजैविक शोधले.
ब) 1940 पासून पेनीसिलीनची औषधाच्या स्वरूपात निर्मिती सुरु झाली.
क) 1940 त 1960 हा काल प्रतिजैविकांचे सुवर्णयुग म्हणून ओळखला जातो.
ड) प्रतिजैविकांना दाद न देणाऱ्या रोगजंतूंना सुपरबग्ज म्हणतात.
1) अ, ब
2) अ, ब, क
3) ब, क
(4) वरील सर्व
स्पष्टीकरण
- पेनिसिलीन हे पहिले प्रतिजैविक (Antibiotics) शोधले गेले.
- त्याची निर्मिती पेनिसिलीअम पासून करण्यात आली.
Q. 1920 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या …………..या संशोधकाने प्रोजेस्टेरॉन हे सियांमधील संततीप्रतिबंधक हार्मोन शोधले.
1) डॉ. किम लेव्हीस
2) अलेक्झांडर फ्लेमिंग
3) लुडवीन हाबेरलैंड
4) डॉ. कार्ल जेरासी
स्पष्टीकरण
- प्रोजेस्टेरॉनचा मुख्य उद्देश म्हणजे फलित अंड्याचे रोपण आणि वाढ होण्यासाठी एंडोमेट्रियम तयार करणे.
- प्रोजेस्टेरॉन हे प्रामुख्याने स्रियांमध्ये गर्भधारणेचे संप्रेरक म्हणून कार्य करते.
Q. कोविड-19 साठी मानक चाचणी काय आहे?
1) आरटीपीसीआर (RTPCR)
2) आरएटी (RAT)
3) एलआयएसए (ELISA)
4) डब्ल्युजीएस (WGS)
स्पष्टीकरण
- RTPCR म्हणजे रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन पॉलीमर्स चेन रीऐक्शन,
- या चाचणीमध्ये कोरोना विषाणूंच्या आरएनए (RNA) ची चाचणी केली जाते.
- नाक आणि घशातून नमुने घेतले आतात.
- ELISA चाचणी एड्स (AIDS) साठी.
- RAT चाचणी कोरोना साठी.
Q. पॉलीग्राफ हे यंत्र कशाशी संबंधित आहे?
1) खोटे बोलणे ओळखणे
2) रक्तदाब मोजणे
3) शरीरातील पाणी मोजणे
4) विषाणू मोजणे
स्पष्टीकरण
- पॉलीग्राफ टेस्ट- आपण खोटे बोलतो तेव्हा आपल्या शरीरातील काही गोष्टींमध्ये आपोआप बदल होतात जसे की हृदयाच्या ठोक्याची गती वाढणे, श्वासामधील अंतर वाढणे, रक्तदाब खालीवर होणे, हातापायाला घाम येणे. यामध्ये मशिनचे चार किंवा पाच पॉईंट छातीवर किंवा बोटांना जोडलेले असतात.
- नार्को टेस्ट- Truth Serum नावाचे गुंगीचे औषध देवून मानसोपचार तज्ज्ञाच्या सहाय्याने निरीक्षण केले जाते.
Q. चित्रपट हे यंत्रयुगाचे … होय.
1) शास्र
2) प्रेम
3) शाप
4) अपत्य
स्पष्टीकरण
- अगोदर यंत्र युग आले त्यापासून चित्रपट निर्मितीसाठी चालना मिळाली. पडद्यावर माहितीपट चित्रपट दाखवता येऊ लागले.
- पहिला चित्रपट राजा हरिश्चंद्र (1913) दादासाहेब फाळके यांच्याद्वारे निर्मिती.
Q. ज्यांच्या नावाने ‘बोरलॉग पुरस्कार’ प्रदान केला जातो त्या डॉ. नॉर्मन बोरलॉग यांचे. ….. या क्षेत्रातील कार्य असामान्य आहे.
1) विज्ञान
2) कृषी
3) संगीत
4) साहित्य
स्पष्टीकरण
- जगाच्या हरितक्रांतीचे जनक – नॉर्मन बोरलॉग
- भारतीय हरितक्रांतीचे जनक
- डॉ. एम. एस. स्वामीनाथन
- गहू पिकाचे उत्पादन – (1965)
- लर्मा रोजो जातीच्या गव्हाची अमेरिकन आयात करून झाली.
Q. दूरचित्रवाणी हे… माध्यम असल्याने वृत्तपत्रे, आकाशवाणी यांच्या तुलनेत नागरिकांवर अधिक प्रभाव पडतो.
1) संगीताचे
2) चित्रपटाचे
3) दृक्श्राव्य
4) मनोरंजनाचे
स्पष्टीकरण
- दृकश्राव्य म्हणजे दिसणे तसेच ऐकू येणारे माध्यम.
Q. अनॉटॉमी म्हणजे काय?
1) सजीवांच्या बाह्यरचनेचा अभ्यास
2) विषाणूंचा अभ्यास
3) सजीवांच्या आंतररचनेचा अभ्यास
4) सजीवांच्या पेशींचा अभ्यास
स्पष्टीकरण
- जीवाणूंचा अभ्यास – (Bacteriology)
- विषाणूंचा अभ्यास – (Virology)
- पेशींचा अभ्यास – (Cytology)
- सजीवांच्या बाहारचनेचा अभ्यास (Morphology)
Leave a comment