MPSC History Questions in Marathi 2024
विद्यार्थीमित्रांनो आधुनिक भारताचा इतिहास हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक असून या टॉपिक संबंधी MPSC परीक्षेमध्ये भरपूर प्रश्न विचारले जातात. म्हणूनच आजच्या लेखामध्ये मी भारतात इंग्रजी सत्तेची स्थापना, ईस्ट इंडिया कंपनीचे आर्थिक धोरण, 1857 चा उठाव, सशस्त्र घरांचे कार्य, स्वातंत्र्योत्तर भारताचा इतिहास, भारताचे घटनात्मक प्रगती यांसारख्या विषयांवर History Questions in Marathi प्रश्न या लेखामध्ये समाविष्ट केलेले आहे.
Q. पुण्यात फर्गसन कॉलेजमधील वाडिया ग्रंथालयाच्या उद्घाटनप्रसंगी हॉटसन यांच्यावर गोळ्या झाडल्या…….
A. अनंत कान्हेरे
B. कर्वे व कान्हेरे
C. वासुदेव गोगटे
D. नाना पाटील
Q. महाराष्ट्रात सातारा जिल्हा किंवा ‘पत्री सरकार’ची आणि परिसरात ‘प्रतिसरकार’ स्थापना कोणी केली ?
A. नाना पाटील
B. यशवंतराव चव्हाण
C. वसंतदादा पाटील
D. किसन बीर
Q. ‘पुणे करारा’स कारणीभूत ठरलेला जातीय निवाडा १९३२ मध्ये प्रसिद्ध झाला. हा निवाडा इंग्लंडचे पंतप्रधान यांनी …………जाहीर केला होता.
A. रॅम्से मॅक्डोनाल्ड
B. व्हाइसरॉय विलिंग्डन
C. विन्स्टन चर्चिल
D. व्हाइसरॉय आयर्विन
Q. सन १९३५ मध्ये ब्रह्मदेश भारतापासून वेगळा केला गेला. कोणत्या वर्षी ब्रह्मदेश ब्रिटिशांच्या अमलाखाली आला होता ?
A. १८५८
B. १८७१
C. १८८१
D. १८८५
Q. खालीलपैकी कोणाचा उल्लेख ‘१८५७ च्या युद्धातील एक नेतृत्व’ असा करता येणार नाही?
A. अयोध्येची बेगम हजरत महल
B. जगदीशपूरचा जमीनदार कुँवरसिंह
C. तात्या टोपे
D. यशवंतराव होळकर
Q. खालीलपैकी तीन भारतीय विचारवंत १८५७ च्या उठावास स्वातंत्र्ययुद्ध मानीत नाहीत; तर त्याची ‘बंड किंवा शिपाईगर्दी’ म्हणून संभावना करतात, मात्र, चौथे भारतीय विचारवंत या उठावास स्वातंत्र्ययुद्ध म्हणून गौरवितात. हे चौथे विचारवंत म्हणजे…….
A. न. र. फाटक
B. डॉ. आर. सी. मुजुमदार
C. किशोरचंद्र मित्रा
D. वि. दा. सावरकर
Q. मंगल पांडे या हिंदी शिपायाने मेजर ह्यूसन वर झाडलेल्या गोळीने बराकपूरच्या छावणीत १८५७ च्या उठावाची पहिली ठिणगी पडली. याच प्रकाराची पुनरावृत्ती इतरही लष्करी छावण्यांमध्ये झाली. खालीलपैकी कोणते ठिकाण यापासून अलिप्त होते?
A. अंबाला
B. लखनी
C. मीरत
D. लाहोर
Q. २२ ऑक्टोबर, १७६४ रोजी बक्सरची लढाई जिंकून इंग्रजांनी भारतातील आपल्या सत्तेचा पाया बळकट केला. ही लढाई त्यांनी कोणाविरुद्ध जिंकली?
A. अयोध्येचा नवाब शुजाउद्दौला
B. बंगालचा परागंदा नवाब मौर कासीम
C. दिल्लीचा बादशहा शहाआलम
D. वरील तिघांच्या युतीविरुद्ध
Q. वॉरन हेस्टिंग्जच्या कारकिर्दीसंदर्भात खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
A. त्याच्याच कारकिर्दीत चार्ल्स विल्कीन्सने भगवद्-गीतेचे इंग्रजीत भाषांतर केले
B. त्याने बंगालमधील दुहेरी राज्यव्यवस्था रद्द केली
C. भारतातील पहिले वृत्तपत्र ‘दी बेंगॉल गॅझेट’ त्याच्याच कारकिर्दीत सुरू झाले
D. त्याने कायमधारा पद्धती सुरू केली
Q. खाली काही ब्रिटिश गव्हर्नर जनरल व त्यांनी केलेल्या महत्त्वपूर्ण कामगिऱ्या यांच्या जोड्या दिल्या आहेत. त्यांपैकी कोणती जोडी चुकीची आहे?
A. माविर्वस ऑफ हेस्टिंग्ज: पेंढाऱ्यांचा बिमोड
B. लॉर्ड विल्यम बेंटिंक: ठगांचा बंदोबस्त
C. लॉर्ड हार्डिंग्ज: सरकारी कार्यालयांना रविवारी सुटी
D. लॉर्ड कॅनिंग: नवा पोस्ट ऑफिस कायदा
Q. (१) राजा राममोहन रॉय यांनी ब्रिटिश इंडिया युनिटेरियन असोसिएशनची व आत्मीय सभेची स्थापना केली.
(२) दादाभाई नौरोजींनी ‘रास्त गोफ्तार’ म्हणजे ‘खरी बातमी’ या नावाचे साप्ताहिक काढले.
A. पहिले विधान योग्य
B. दोन्ही विधाने अयोग्य
C. दोन्ही विधाने योग्य
D. फक्त दुसरे विधान योग्य
Q. (१) सर्व धर्माचा तुलनात्मक अभ्यास असलेला ‘सत्यार्थ- प्रकाश’ हा ग्रंथ दयानंद सरस्वती यांनी लिहिला.
(२) ऋग्वेद व यजुर्वेद या वेदांचे स्वामी दयानंदांनी हिंदीत भाषांतर केले आहे.
(३) स्वामी दयानंद सरस्वती बांनी ७ एप्रिल, १८७५ रोजी कोलकाता येथे ‘आर्य समाजा’ची स्थापना केली.
वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत?
A. फक्त १, २ व ३
B. फक्त १ व २
C. फक्त २ व ३
D. फक्त १ व ३
Q. संस्थानिकांच्या मुलांना लष्करी शिक्षण उपलब्ध व्हावे याकरिता सन १९०१ मध्ये ‘इंपिरिअल कॅडेट कोअर’ ची स्थापना करण्याचे श्रेय कोणत्या व्हाइसरॉयला द्यावे लागते?
A. लॉर्ड कॅनिंग
B. लॉर्ड रिपन
C. लॉर्ड कर्झन
D. लॉर्ड किचनेर
भारतीय इतिहास MPSC वस्तुनिष्ठ प्रश्नोत्तरे
Q. खालीलपैकी कोणास ‘स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक’ असे म्हटले जाते?
A. लॉर्ड रिपन
B. लॉर्ड लिटन
C. लॉर्ड डफरिन
D. लॉर्ड कर्झन
Q. एकोणिसाव्या शतकात भारतात झालेली वैचारिक व राजकीय जागृती प्रामुख्याने कोणत्या समाजघटकात झाली होती?
A. अमीर-उमराव व संस्थानिक
B. सुशिक्षित उच्च मध्यमवर्गीय
C. कष्टकरी सामान्य जनता
D. अति श्रीमंत अभिजन वर्ग
Q. (१) सर. ए. ओ. ह्यूम यांच्या प्रेरणेने ‘राष्ट्रसभे’ची स्थापना झाली.
(२) ‘राष्ट्रसभे’च्या १९१६ मधील अधिवेशनात जहाल व मवाळ यांच्यात तडजोड झाली.
(३) हे अधिवेशन लखनौ येथे भरले होते.
वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत?
A. १, २ व ३
B. फक्त १ व २
D. कोणतेही नाही.
C. फक्त १ व ३
Q. ……. यांना ‘भारतातील आर्थिक राष्ट्रवादाचे जनक’ म्हणून ओळखले जाते.
A. दादाभाई नौरोजी
B. आर. सी. दत्त
C. न्यायमूर्ती रानडे
D. एम. विश्वेश्वस्य्या
Q. बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना………
A. अॅनी बेझंट
B. राजा राममोहन रॉय
C. पंडित मदन मोहन मालवीय
D. आचार्य कृपलानी
Q. (१) लोकमान्य टिळकांनी २८ एप्रिल, १९१६ रोजी मुंबई प्रांतात (बेळगावी येथे) होमरूल लीगची स्थापना केली.
(२) सप्टेंबर, १९१६ मध्ये अॅनी बेझंट यांनी ‘ऑल इंडिया होमरूल लीग’ ची स्थापना केली.
(३) उपरोक्त दोन्ही संघटना स्वतंत्र होत्या; परंतु, त्यांच्यात बव्हंशी समन्वय होता.
A. फक्त पहिले विधान बरोबर
B. फक्त दुसरे विधान बरोबर
C. फक्त तिसरे विधान चूक
D. तिन्ही विधाने बरोबर
Q. विसाव्या शतकातील दुसऱ्या दशकात भारतात चालविली गेलेली होमरूल चळवळ कोणत्या देशातील याच धर्तीच्या चळवळीवर आधारित होती?
A. दक्षिण आफ्रिका
B. आयर्लंड
C. इटली
D. स्वीडन
Q. …….. च्या सुधारणा कायद्यान्वये मुस्लिमांप्रमाणे शिखांनाही स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले होते.
A. १९०९
B. १९१९
C. १९३५
D. १९४२
Q. खालीलपैकी कोणी सार्वजनिक गणेशोत्सव व सार्वजनिक शिवजयंती हे उत्सव सुरू केले?
A. लोकमान्य टिळक
B. गो. कृ. गोखले
C. गो. ग. आगरकर
D. न्यायमूर्ती रानडे
Q. (१) ‘न्यू इंडिया’ हे वर्तमानपत्र बिपिनचंद्र पाल चालवीत असत.
(२) ‘वंदे मातरम्’ हे वर्तमानपत्र अरविंद घोष हे चालवीत असत.
(३) अरविंद घोष यांचे बंधू बारिंद्र घोष ‘युगांतर’ हे वर्तमानपत्र चालवीत.
A. तीनही विधाने अयोग्य आहेत.
B. तीनही विधाने योग्य आहेत.
C. फक्त दुसरे आणि तिसरे विधान अयोग्य आहे.
D. फक्त दुसरे विधान योग्य आहे.
Q. ……….. यांनी २१ वर्षांनी म्हणजे १३ मार्च, १९४० रोजी जनरल ओडवायर याची लंडन येथे हत्या करून ‘जालियनवाला बाग हत्याकांडा’चा सूड उगविला.
A. लाला हरदयाळ
B. सरदार अजितसिंग
C. उधमसिंग
D. सोहनसिंग भाकना
Q. मुस्लीम लीगचे प्रतिनिधी ………… यांचा पं. जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारमध्ये ‘अर्थमंत्री’ म्हणून समावेश करण्यात आला होता.
A. बॅ. महंमदअली जीना
B. शाहनवाझ खान
C. लियाकत अली खान
D. रहमतअली चौधरी
Q. सन १९१९ मध्ये लोकमान्य टिळकांनी राष्ट्रीय असंतोष प्रकट करण्यासाठी…. या नव्या मार्गाची घोषणा केली.
A. असहकार
(च) बहिष्कार
C. सत्याग्रह
D. प्रतियोगिता सहकार
Q. खालीलपैकी कोणी ‘The Gagging Act’ असे टोपणनाव मिळालेला देशी वृत्तपत्र कायदा संमत करून भारतीयांचा रोष ओढवून घेतला होता?
A. लॉर्ड लिटन
B. लॉर्ड रिपन
C. लॉर्ड कर्झन
D. लॉर्ड बॅटिंक
Q. ‘अ नेशन इन दी मेकिंग’ या ग्रंथाचे कर्ते
A. व्योमेशचंद्र बॅनर्जी
B. सुरेंद्रनाथ बॅनर्जी
C. अरविंद घोष
D. सुभाषचंद्र बोस
Q. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म येथे झाला.
A. रत्नागिरीजवळ चिखली
B. दापोलीजवळ आंबडवे
C. इंदूरजवळ महू
D. मराठवाड्यात औरंगाबाद
MPSC History GK Questions in Marathi
Q. ‘इन्किलाब झिंदाबाद’ या घोषणेचे व ‘ये हिंदोस्तों हमारा’ या कवितेचे जनक….. यांनीच मुस्लिमांच्या स्वतंत्र राष्ट्राची कल्पना सर्वप्रथम मांडली.
A. मिर्झा गालीब
B. डॉ. महंमद इक्बाल
C. लियाकत अली
D. बॅ. महंमदअली जीना
Q. ….. यांनी मुंबई येथे परदेशी मालाच्या मोटारीसमोर सत्याग्रह करून आत्मबलिदान केले.
A. श्रीकृष्ण सारडा
B. विष्णू गणेश पिंगळे
C. बाबू गेनू
D. बासुदेव गोगटे
Q. मिठाचा जुलमी कायदा रद्द करण्यासाठी ……… रोजी गांधीजींनी आपल्या ७५ सहकाऱ्यांसह साबरमती आश्रमापासून दांडीयात्रेस आरंभ केला. याच दिवसापासून सविनय कायदेभंगाचा लढा सुरू झाला.
A. १२ मार्च, १९२९
B. ३१ डिसेंबर, १९२९
C. २६ जानेवारी, १९३०
D. १२ मार्च, १९३०
Q. (१) काँग्रेसचे ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली सन १९३६ मध्ये खानदेशात फैजपूर येथे पार पडले.
(२) आपण समाजवादी असल्याचे काँग्रेसचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू यांनी स्पष्टपणे प्रतिपादन केले होते.
(३) जवाहरलाल नेहरू यांनी त्यांचा डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ अहमदनगर येथील तुरुंगात लिहिला.
A. तीनही विधाने अयोग्य आहेत.
B. तीनही विधाने योग्य आहेत.
C. फक्त विधान पहिले योग्य आहे.
D. फक्त विधान दुसरे अयोग्य आहे.
Q. ….. यांनीच खऱ्या अथनि महिलांना स्वातंत्र्यचळवळीच्या राजकीय प्रवाहात मोठ्या प्रमाणावर सहभागी करून घेतले.
A. लोकमान्य टिळक
B. महात्मा गांधी
C. महर्षी कर्वे
D. सरोजिनी नायडू
Q. मौलाना आझाद यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते / ती विधान/ने चूक आहे/आहेत?
(१) ८ ऑगस्ट, १९४२ च्या अखिल भारतीय काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षपद मौलाना आझाद यांनी भूषविले होते.
(२) ‘इंडिया विन्स फ्रिडम’ या ग्रंथाचे कर्ते मौलाना आझाद होत.
A. फक्त १
B. फक्त २
C. १ व २ दोन्ही
D. कोणतेही नाही
Q. (१) इंग्लंडच्या पंतप्रधानांनी ८ ऑगस्ट, १९४० रोजी एक निवेदन काढून हिंदुस्थानला वसाहतीचे स्वातंत्र्य देणे हे इंग्लंडचे धोरण असल्याचे इंग्लंडचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी जाहीर केले, हे निवेदन ‘ऑगस्ट घोषणा’ म्हणून प्रसिद्ध आहे.
(२) भारतीय प्रश्नावर तोडगा काढण्याबाबत शिष्टाई करण्यासाठी इंग्लंडचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी मार्च, १९४२ मध्ये सर फर्ड स्टॅफर्ड क्रिप्स यांना भारतात पाठविण्याची घोषणा केली. वरीलपैकी कोणते/ती विधान/ने सत्य आहे/आहेत ?
A. फक्त २
B. १ व २ दोन्ही
C. फक्त १
D. ना १ वना २
Q. तैनाती फौज स्वीकारावी, हा ब्रिटिशांचा प्रस्ताव धुडकावून लावणारा व शेवटपर्यंत तो न स्वीकारणारा एतद्देशीय राज्यकर्ता……..
A. निजाम
B. अयोध्येचा नवाब
C. दुसरा बाजीराव
D. टिपू सुलतान
Q. लॉर्ड विल्यम बेंटिंक याच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान चुकीचे ठरेल?
A. शासनामध्ये भारतीयांना स्थान देणारा बेटिंक हा पहिलाच गव्हर्नर जनरल होय,
B. ठगांचे पूर्ण उच्चाटन, ही बेंटिकची महत्त्वपूर्ण कामगिरी होय.
C. बेंटिंकच्याच कारकिर्दीत एतद्देशीयांना इंग्रजी भाषेतून पाश्चात्त्य शिक्षण देण्याचे धोरण स्वीकारले गेले.
D. मुद्रणस्वातंत्र्यावर पूर्वी असलेले सर्व निर्बंध दूर करण्याचे श्रेय उदारमतवादी बेंटिकलाच द्यावे लागेल
Q. ……….यांनी ब्रिटिश पार्लमेंटपुढील आपल्या भाषणात १८५७ च्या उठावाची संभावना ‘बंड’ या शब्दात केली.
A. जनरल मॅक्लॉईड
B. टी. आर. होल्म्स
C. अर्ल स्टॅन्ले
D. सी. टी. मेटकॉफ
Q. खालीलपैकी कोणते कारण १८५७ च्या उठावाचे कारण म्हणून गणता येणार नाही?
A. ब्रिटिशांच्या धार्मिक धोरणाबद्दल साशंकता
B. संस्थाने खालसा करण्याचे धोरण व एतद्देशीय राज्यकर्त्यांवरील अन्य स्वरूपाचे अन्याय
C. स्वतंत्र, सार्वभौम व लोकशाही राष्ट्रनिर्मितीची सामान्य जनतेत निर्माण झालेली तीव्र आकांक्षा
D. ब्रिटिशांचा विविध प्रकारचा आर्थिक साम्राज्यवाद
Q. सर जॉन लॉरेन्स ते लॉर्ड नॉर्थब्रुक या कालावधीतील व्हाइसरॉय यांनी स्वीकारलेल्या धोरणांचे वर्णन…..असे केले जाऊ शकते.
A. कुशल निष्क्रियतेचे धोरण
B. कौशल्यपूर्ण आक्रमक धोरण
C. साम्राज्यविस्ताराचे धोरण
D. मवाळ व उदारमतवादी धोरण
Q. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? १८५७ च्या उठावास अपयश आले, कारण
A. पतियाळा, जिंद, ग्वाल्हेर, हैदराबाद व अफगाणिस्तान येथील सत्ताधीश इंग्रजांशी एकनिष्ठ राहिले
B. डलहौसीने केलेल्या तारायंत्रासारख्या सुधारणा इंग्रजांच्या उपयोगी आल्या; याउलट क्रांतिकारकांकडे अशा सोईचा अभाव होता
C. दगलबाजी, फितुरी, विश्वासघात हे भारतीयांचे नेहमीचे शत्रू नेहमीप्रमाणे इंग्रजांना उपयोगी पडले
D. सर्वसामान्य भारतीय जनता पूर्णपणे इंग्रजांशी एकनिष्ठ राहिली
Q. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? १८५८ च्या कायद्यान्वये
A. ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील सत्ता संपुष्टात येऊन ती इंग्लंडच्या राजघराण्याकडे गेली
B. ‘भारतमंत्री’ हे पद नव्यानेच निर्माण केले गेले व त्याच्या वेतनाचा खर्च भारताच्या उत्पन्नातून भागविण्याची तरतूद केली गेली
C. भारताच्या गव्हर्नर जनरलला ‘व्हाइसरॉय’ ही उपाधी मिळाली व तो ब्रिटिश राजसत्तेचा भारतातील प्रतिनिधी बनला
D. राजकीय कारणास्तव दत्तक वारसा नामंजूर करण्याचे नवे धोरण स्वीकारण्यात आले
Q. मुंबई इलाख्यातील शिक्षणप्रसाराच्या कार्यात विशेष रस घेणारे मुंबई इलाख्याचे पहिले गव्हर्नर ….
A. रॉबर्ट ग्रेट
B. माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन
C. ग्रँट डफ
D. सर विल्यम हंटर
Q. मुंबई इलाख्याचे गव्हर्नर ……. यांच्या स्मरणार्थ मुंबईत इ. स. १८३९ मध्ये ‘ग्रँट मेडिकल कॉलेज’ची स्थापना करण्यात आली.
A. ग्रँट डफ
B. रॉबर्ट अँट
C. जॉन माल्कम
D. माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन
Q. लॉर्ड कर्झनच्या कारकिर्दीसंदर्भात खाली केलेल्या विधानांपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
A. त्याच्याच कारकिर्दीत २२ जून, १८९७ रोजी चापेकर बंधूंनी पुण्यात रँड व आयहर्स्ट या इंग्रज अधिकाऱ्यांना ठार केले
B. शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात कर्जे मिळावीत या उद्देशाने सन १९०४ मध्ये सहकारी पतपेढी कायदा हा भारतातील सहकारविषयक पहिला कायदा संमत केला गेला
C. शिक्षण क्षेत्रावर सरकारी नियंत्रण प्रस्थापित करून भारतातील राजकीय चळवळीची केंद्रे नष्ट करण्याच्या हेतूने १९०४ मध्ये विद्यापीठ कायदा संमत करण्यात आला
D. सन १८९९ मध्ये भारतीय चलन कायदा संमत करण्यात आला व भारतासाठी सुवर्ण प्रमाण (गोल्ड स्टैंडर्ड) स्वीकारण्यात आले
Q. स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतीय वृत्तपत्र इतिहासाचा विचार करता १८३५ च्या सुमारास भारताचे हंगामी गव्हर्नर जनरलपद भूषविणाऱ्या …. वे वर्णन ‘भारतीय वृत्तपत्र स्वातंत्र्याचा उद्गाता’ असे करावे लागेल.
A. लॉर्ड मेटकॉफ
C. लॉर्ड लिटन
B. लॉर्ड अॅडम्स
D. लॉर्ड स्टॅन्ले
Q . खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
A. विल्यम बेंटिक याच्या कारकिर्दीत दरबारी भाषा म्हणून पर्शियन भाषेस असलेले स्थान संपुष्टात आले
B. एलनबरो या गव्हर्नर जनरलच्या कारकिर्दीत सिंध प्रांत ब्रिटिश हिंदुस्थानला जोडला गेला
C. लॉर्ड डलहौसीच्या कारकिर्दीत सार्वजनिक बांधकाम या नव्या खात्याची स्थापना केली गेली
D. लॉर्ड कॉर्नवॉलीसने कुळांना संरक्षण देणारा कुळ कायदा संमत करून घेतला
Q. खालीलपैकी कोणत्या भारतीय विचारवंताचा मृत्यू ब्रिस्टॉल (इंग्लंड) येथे झाला?
A. स्वामी विवेकानंद
B. दयानंद सरस्वती
C. मौलाना चिरागअली
D. राजा राममोहन रॉय
MPSC History important topics in marathi
Q. इंग्लंडमधील कु. मार्गारेट नोबेल या विवेकानंदांच्या शिष्या बनल्या. त्या पुढे…. या नावाने प्रसिद्धीस आल्या.
A. माँ आनंद शीला
B. भगिनी निवेदिता
C. मदर मागरिट
D. माताजी
Q. महाराष्ट्रातील उठावात खालीलपैकी कोण सहभागी झाले नव्हते ?
A. कोल्हापूरचे चिमासाहेब
B. नरखेडचे रंगराव पागे
C. वैजापूरचे गोविंदराव देशपांडे
D. ग्वाल्हेरचे शिंदे
Q. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? इंग्रज राजवटीत…………
A. भारत अधिकाधिक शेतीप्रधान बनत गेला
B. भारतीय हस्तव्यवसाय व उद्योगधंदे यांचा प्हास झाला
C. चहा, कॉफी व नीळ यांची निर्यात वाढली
D. शेतीवरील कुळांची स्थिती सुधारली
Q. सार्वजनिक सभेचे संस्थापक व सार्वजनिक सभेच्या कार्यातील धडाडीचा सहभाग यामुळे ……… यांना सार्वजनिक काका असे संबोधले जाई.
A. गणेश वासुदेव जोशी
B. गोपाळ हरी देशमुख
C. बाळशास्त्री जांभेकर
D. डॉ. भाऊ दाजी लाड
Q. ….. यांनी १९०१ मध्ये बोलपूर येथे ‘शांतिनिकेतन’ची स्थापना केली.
A. दादाभाई नौरोजी
B. रवींद्रनाथ टागोर
C. अरविंद घोष
D. देवेंद्रनाथ ठाकूर
Q. मार्च, १९४६ मध्ये भारतात आलेल्या कॅबिनेट मिशनमध्ये (त्रिमंत्री मंडळ) खालीलपैकी कोणत्या तीन मंत्र्यांचा समावेश होता?
(१) पॅथिक लॉरेन्स
(२) स्ट्रॅफर्ड क्रिप्स
(३) ए. व्ही. अलेक्झांडर
(४) क्लेमंट अटली
A. १, २, ४
B. १, ३, ४
C. २, ३, ४
D. १, २, ३
Q. संस्थानांचे भारतात विलीनीकरण करण्याच्या कारवाईत भारताचे तत्कालीन गृहमंत्री …….. यांच्या मुत्सद्देगिरीचे व कणखर नेतृत्वाचे दर्शन घडते.
A. व्ही. के. कृष्णमेनन
B. यशवंतराव चव्हाण
C. वल्लभभाई पटेल
D. लालबहादूर शास्त्री
जर तुम्ही MPSC परीक्षेची तयारी करत असाल तर या लेखामध्ये दिलेले सर्व प्रश्न एकदा नक्की वाचून जा. तसेच तुम्हाला काही शंका असतील या प्रश्नसंबंधी किंव्हा MPSC EXAM संबंधी तर कंमेंट मध्ये नक्की सांगा.
हे देखील वाचा
Leave a comment