इतिहास MPSC वस्तुनिष्ठ प्रश्नोत्तरे | MPSC History Questions and Answers in Marathi
इतिहास MPSC वस्तुनिष्ठ प्रश्नोत्तरे: विद्यार्थीमित्रांनो MPSC परीक्षेमध्ये इतिहास या विषयावर भरपूर प्रश्न विचारले जातात. म्हणूनच आजच्या या लेखात तुमच्या साठी घेऊन आलो आहे MPSC History Questions and Answers in Marathi.
MPSC History Questions and Answers in Marathi
Q. कोणत्या देशातील प्रतिक्रियेमुळे भारतात खिलाफत चळवळ सुरु झाली?
A. इंग्लंड
B. जर्मनी
C. ब्रह्मदेश
D. तुर्कस्तान
उत्तर: D. तुर्कस्तान
Q. 1920 च्या असहकार चळवळीस काय प्रेरक होते ?
अ) पहिल्या महायुद्धाने वाढलेली महागाई.
ब) सरकारच्या कायद्याने व्यक्ती व व्यक्तीस्वातंत्र्यावर घातलेल्या मर्यादा.
क) ब्रिटिशांच्या विरोधातील असंतोष.
ड) खिलाफत प्रश्नामुळे ब्रिटीश विरोधी मुस्लीम समाज.
A. अ व ब
B. ब व क
C. अ, ब व क
D. अ, ब, क, व ड
उत्तर: D. अ, ब, क, व ड
Q. जलियांवाला बागेतील निरपराधी निःशस्त्र जनतेवर गोळीबार करण्याचे आदेश कोणी दिले?
A. जनलर डायर
B. ओ ‘ड्वायर
C. चेम्सफर्ड
D. कर्झन
उत्तर: A. जनलर डायर
Q. महात्मा गांधीजींनी पहिला राष्ट्रव्यापी ‘सत्याग्रह’ केला …….
A. असहकार चळवळीच्या वेळी
B. जालियनवाला बाग क्रूरतापूर्ण घडलेल्या घटनेविरुद्ध झालेल्या चळवळीच्या वेळी
C. खिलाफत चळवळीच्या वेळी
D. रौलट अॅक्ट विरुद्ध झालेल्या चळवळीच्या वेळी
उत्तर: D. रौलट अॅक्ट विरुद्ध झालेल्या चळवळीच्या वेळी
Q. ‘चौरी-चौरा’ घटनेने ……….हे आंदोलन संपुष्टात आले.
A. रौलट विरोधी सत्याग्रह
B. छोडो भारत
C. असहकार
D. सविनय कायदेभंग
उत्तर: C. असहकार
Q. पुढीलपैकी स्वराज्य पक्षाच्या अपयशाची कारणे कोणती होती?
अ) ब्रिटीशांची ‘फोडा आणि झोडा’ निती
ब) पक्ष शिस्तीचा अभाव
क) जनतेच्या पार्टीब्याचा अभाव
ड) स्वराज्य पक्षात फुट
पर्यायी उत्तरे :
A. अ आणि क फक्त
C. क आणि ड फक्त
B. ब आणि ड फक्त
D. अ, ब, क आणि ड
उत्तर: D. अ, ब, क आणि ड
Q. स्वराज्य पक्षाचे महाराष्ट्रातील पुढीलपैकी कोणते सभासद होते ?
अ) न.चि. केळकर
ब) शांताराम दाभोळकर
क) पुरुषोत्तमदास त्रिकमदास
ड) भुलाभाई देसाई
इ) जाफरभाई लालजी
A. अ, ब, क फक्त
C. अ, ब, क आणि ड फक्त
B. क, ड, इ फक्त
D. अ, ब, क, ड आणि इ
उत्तर: D. अ, ब, क, ड आणि इ
Q. स्वराज पार्टीची स्थापना झाल्यावर, गांधीजींना हवे होते की काँग्रेसजनांनी ग्रामीण भागात विधायक कामे करावीत. त्यात काय सम्मिलित नव्हते ?
A. दारूबंदी मोहीम
B. कमजोर वर्गात व अस्पृश्यांकरता सामाजिक कार्य
C. सर्व वर्गाकरता इस्पितळांची स्थापना
D. राष्ट्रीय शाळांची स्थापना
उत्तर: C. सर्व वर्गाकरता इस्पितळांची स्थापना
Q. खालीलपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य कोण होते ?
A. महात्मा गांधी
B. लोकमान्य टिळक
C. चित्तरंजन दास
D. न्यायमूर्ती रानडे
उत्तर: C. चित्तरंजन दास
Q. स्वराज्य पक्षाचे ध्येय काय होते ?
A. परकीय वस्तुवर बहिष्कार टाकणे,
B. भारतीय उद्योगांना पाठिंबा देणे.
C. ब्रिटिश साम्राज्यान्तर्गत स्वराज्य.
D. असहकार चळवळ सुरू करणे.
उत्तर: C. ब्रिटिश साम्राज्यान्तर्गत स्वराज्य.
Q. इ.स.1919 च्या कायद्यानुसार घेतलेल्या निवडणुकीत केंद्रीय कायदेमंडळातील सर्वात मोठा पक्ष कोणता होता ?
A. उदारमतवादी पक्ष
B. स्वराज्य पक्ष
C. काँग्रेस पक्ष
D. मुस्लिम लीग
उत्तर: B. स्वराज्य पक्ष
Q. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी 1918 मध्ये ‘सारा बंदी’ ची चळवळ कोणत्या जिल्ह्यात सुरू केली ?
A. गोरखपूर
B. सोलापूर
C. खेडा
D. पुणे
उत्तर: C. खेडा
इतिहास MPSC वस्तुनिष्ठ प्रश्नोत्तरे
Q. गांधीजींनी “सत्याग्रह सभा” कशाच्या विरोधात सुरू केली ?
A. मीठ कायदा
B. रौलेट कायदा
C. भारत सरकारचा 1919 चा कायदा
D. जालीयनवाला बाग हत्याकांड
उत्तर: B. रौलेट कायदा
Q. चंपारण्य मधील शेतकऱ्यांचा लढा……. शी संबंधित होता.
A. ऊस
B. कापूस
C. भात
D. नीळ
उत्तर: D. नीळ
Q. 1921 साली अखिल भारतीय खिलाफत कमिटीचे अधिवेशन कोठे भरले होते?
A. कराची
B. दिल्ली
C. लाहोर
D. सिंध
उत्तर: A. कराची
Q. राष्ट्रीय सभेच्या सन 1920 मधील कलकत्ता येथील अधिवेशनात असहकाराचा जाहिरनामा मंजूर केला. या अधिवेशनाचे अध्यक्ष …………..हे होते.
A. डॉ. एनी बेझंट
B. पं. मदनमोहन मालवीय
C. लाला लजपतराय
D. बद्रुद्दीन तय्यबजी
उत्तर: C. लाला लजपतराय
Q. महात्मा गांधीजींनी मुस्लिमांच्या खिलाफत चळवळीस पाठींबा दिला, कारण………
अ) त्यांना या चळवळीतून हिंदू-मुस्लिम ऐक्य साधायचे होते म्हणून
ब) त्यांना या चळवळीचा उपयोग देशाच्या राष्ट्रीय चळवळीची प्रगती करून घेता येईल असे वाटले म्हणून
क) त्यांना इस्लाम धर्माचा प्रचार करायचा होता म्हणून.
A. अ, ब फक्त
B. अ, ब, क
C. अ, क फक्त
D. ब, क फक्त
उत्तर: A. अ, ब फक्त
Q. अमृतसर येथे झालेल्या अखिल भारतीय खिलाफत परिषदेत व्हॉईसरायकडे एक प्रतिनिधीमंडळ पाठविण्याचे ठरले. त्यांनी 19 जानेवारी 1920 रोजी व्हाईसरायना देण्याच्या पत्रावर सुप्रसिद्ध हिंदू राजकारणी पुढाऱ्यांनी सह्या केल्या होत्या. पुढीलपैकी ते पुढारी कोण होते?
अ) गांधीजी
ब) स्वामी श्रद्धानंद
क) पंडित मोतीलाल नेहरू
ड) पंडित मदन मोहन मालवीय
इ) पंडित जवाहरलाल नेहरू पर्यायी उत्तरे :
A. अ, क, ड, इ
B. ब, क, ड, इ फक्त
C. अ, ब, क, ड आणि इ
D. अ, ब, क, आणि ड फक्त
उत्तर: D. अ, ब, क, आणि ड फक्त
Q. गांधी आयर्विन कराराने ……….ला स्थगिती देण्यात आली.
A. चले जाव चळवळ
B. सविनय कायदेभंग चळवळ
C. रौलेट विरोधी सत्याग्रह
D. भारत छोडो चळवळ
उत्तर: B. सविनय कायदेभंग चळवळ
Q. ‘चौरीचौरा’ घटनेनंतर ……. ही चळवळ संपुष्टात आली.
A. सायमन विरोधी सत्याग्रह
B. असहकार चळवळ
C. असहकार चळवळ
D. सविनय कायदेभंग चळवळ
उत्तर: C. असहकार चळवळ
Q. 1921 मधील मद्रास शहर चळवळीचा महत्त्वाचा भाग म्हणजे……. येथे चार महिने चाललेला संप होय.
A. मद्रास बार काऊन्सिल
B. बकिंगहम अॅन्ड कर्नाटक टेक्स्टाइल मिल्स
C. राजामुंद्री कापड बाजार
D. गुंटूर नगरपालिका
उत्तर: B. बकिंगहम अॅन्ड कर्नाटक टेक्स्टाइल मिल्स
Q. ‘भेटेन नऊ महिन्यांनी’ ही कविता पुढीलपैकी कोणत्या कवीने चौरी- चौरा घटनेत भाग घेतलेल्या व त्यासाठी फाशीवर जाणाऱ्या कैद्याला उद्देशून लिहिली होती?
A. कुंजविहारी
B. कुसुमाग्रज
C. गोविंद
D. नारायण केशव बेहेरे
उत्तर: A. कुंजविहारी
MPSC History Questions and Answers in Marathi
Q. मध्यवर्ती खिलाफत समितींच्या अलाहाबाद येथील सभेत राष्ट्रीयवादी हिंदू पुरोगामी विजयी झाले त्यांना ……… यांचा पाठिंबा होता.
A. टिळक
B. गांधीजी
C. अली बंधू
D. मोतीलाल नेहरू
उत्तर: B. गांधीजी
Q. पुढील दोन विधानांपैकी कोणते अयोग्य आहे?
अ) पंजाबमध्ये शिखांच्या अकाली चळवळीने गुरुद्वारातून भ्रष्ट महंतांना निष्काषित करण्याचा प्रयत्न केला.
ब) ही चळवळ असहकार चळवळीशी जोडली गेली व ब्रिटिश तिच्या बाजूने उभे राहिले नाहीत.
A. केवळ (अ)
B. केवळ (ब)
C. न (अ) वन (ब)
D. दोन्ही (अ) व (ब)
उत्तर: C. न (अ) वन (ब)
Q. ‘उगवती पिढी केवळ निवेदने इत्यादींनी समाधानी होणार नाही…….. दहशतवाद संपविण्याचा एकच मार्ग मला दिसतो आहे व तो म्हणजे सत्याग्रह असे 25 फेब्रुवारी 1919 रोजी गांधीजींनी पत्राद्वारे कोणाला कळविले?
A. जवाहरलाल नेहरूंना
B. मोतीलाल नेहरूंना
C. दिनशा वाच्छांना
D. स्वामी श्रद्धानंदांना
उत्तर: C. दिनशा वाच्छांना
Q. असहकार चळवळ मागे घेतल्यानंतर काँग्रेस दोन भागात विभागली गेली.
अ) एक गट ज्यात वल्लभभाई पटेल, सी. राजगोपालाचारी आणि राजेंद्रप्रसाद अग्रणी होते असे समजत होते की काँग्रेसने निवडणुकीत भाग घ्यावा व विधीमंडळात आतून हल्ला चढवावा.
ब) ज्या गटाचे पुढारी सी. आर. दास, मोतीलाल नेहरू व विठ्ठलभाई पटेल होते तो गट निवडणुकीच्या विरोधात होता.
क) काँग्रेसच्या 1922 च्या पटना येथील सभेत, ज्या सभेचे अध्यक्षपद सी.आर. दास यांच्याकडे होते, निवडणुकीचा प्रस्ताव अमान्य करण्यात आला.
वरील तीन पैकी कोणते विधान बरोबर आहे?
A. अ
B. च
C. क
D. एकही नाही
उत्तर: D. एकही नाही
Q. असहकार चळवळीच्या तीन उद्देशांवर खिलाफत कमिटी व काँग्रेस यांचे एकमत झाले. हे तीन उद्देश कोणते?
A. खिलाफत चळवळीवर समाधानकारक तोडगा मिळविणे, पंजाब मध्ये केलेल्या चुका सुधारणे, व स्वराज्य मिळविणे.
B. बंगाल प्रश्नावर समाधानकारक तोडगा मिळविणे, पंजाब मध्ये केलेल्या चुका सुधारणे, व स्वराज्य मिळविणे.
C. अल्पसंख्यांकांच्या प्रश्नावर तोडगा मिळविणे, जालीयनवाला बागेत झालेल्या चुका सुधारणे व स्वराज्य मिळविणे.
D. खिलाफत चळवळीवर तोडगा मिळविणे, बंगाल मधील चुक सुधारणे व स्वराज्य मिळविणे.
उत्तर: A. खिलाफत चळवळीवर समाधानकारक तोडगा मिळविणे, पंजाब मध्ये केलेल्या चुका सुधारणे, व स्वराज्य मिळविणे.
Q. फेब्रुवारी 1922 च्या चौरीचौरा घटनेनंतर गांधीजींनी असहकार चळवळ तहकूब केली. या घटनेचे वर्णन ‘नॅशनल कॅलॅमिटी’ असे कोणी केले ?
A. पंडीत मोतीलाल नेहरू
B. लाला लजपत राय
C. सुभाषचंद्र बोस
D. पंडीत जवाहरलाल नेहरू
उत्तर: C. सुभाषचंद्र बोस
Q. खालीलपैकी कोणता असहकार चळवळीचा भाग नव्हता ?
A. शाळांवरील बहिष्कार
B. न्यायालयांवरील बहिष्कार
C. परदेशी कापडांवरील बहिष्कार
D. कर न भरणे.
उत्तर: D. कर न भरणे.
Q. गोरखपूर जिल्ह्यातील चौरी चौरा घटनेत 22 पोलीस मरण पावल्यावर काय झाले नाही?
A. गांधीजींना धक्का बसला. त्यांनी चळवळ थांबविली.
B. आम जनता व काँग्रेस पुढाऱ्यांना गांधीजींच्या निर्णयाचा राग आला.
C. इंग्रजांनी गांधीजींना शासन विरोधी कारवायास्तव अटक केली.
D. वरीलपैकी एकही नाही.
उत्तर: D. वरीलपैकी एकही नाही.
Q. गांधीजींनी असहकार चळवळ थांबविण्याचे कारण काय?
A. गांधीजींना अटक
B. काँग्रेसचा विरोध
C. चौरी-चौरा घटना
D. पहिले महायुद्ध
उत्तर: C. चौरी-चौरा घटना
Q. स्वराज पार्टीचे प्रमुख उद्दिष्ट काय होते ?
अ) कायदे मंडळात प्रवेश
ब) इंग्रजांनी स्थापन केलेल्या संस्थांचा बहिष्कार
क) वैधानिक विरोध पर्यायी उत्तरे :
A. अ
B. अ व ब
C. ब व क
D. क
उत्तर: A. अ
Q. बॅरिस्टर जयकर हे पहिल्या गोलमेज परिषदेला………. म्हणून गेले.
A. हिंदू लिबरल
B. हिंदू
C. स्वराज्य पक्षाचे प्रतिनिधी
D. राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी
उत्तर: A. हिंदू लिबरल
Q. …………. यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे महाराष्ट्र सविनय कायदेभंगाची समिती स्थापन झाली होती.
A. शंकरराव देव
B. जमनालाल बजाज
C. के. एफ्. नरिमन
D. किशोरलाल मश्रूवाला
उत्तर: A. शंकरराव देव
Q. पहिल्या गोलमेज परिषदे विषयी काय खरे आहे?
अ) 12 नोव्हेंबर 1930 रोजी तिचे उद्घाटन झाले.
ब) ब्रिटीश पंतप्रधान रॅम्से मॅकडोनाल्ड तिचे अध्यक्ष होते.
क) काँग्रेस धरून 57 ब्रिटीश अमला खालील भारतीय सभासद तिला उपस्थित होते.
ड) परिषदेस एकूण 89 सभासद होते.
पर्यायी उत्तरे :
A. अ आणि ब फक्त
B. अ, ब आणि ड फक्त
C. ब, क आणि ड फक्त
D. क आणि ड फक्त
उत्तर: B. अ, ब आणि ड फक्त
Q. कालानुक्रमे रचना करा:
अ) दुसरी गोलमेज परिषद
ब) नेहरू अहवाल
क) गांधी-आयर्विन करार
ड) जातीय निवाडा
पर्यायी उत्तरे :
A. अ, क, ड, च
B. ब, क, ड, अ
C. ब, क, अ, ड
D. ब, अ, क, ड
उत्तर: C. ब, क, अ, ड
Objective question answer on history in Marathi
Q. खालील घटनांचा क्रम कालक्रमानुसार लावा.
अ) जातीय निवाडा
ब) नेहरू अहवाल
क) गोलमेज परिषदा
ड) सविनय कायदेभंग आंदोलनाची सुरूवात.
A. अ, ब, ड, क
B. ब, ड, क, अ
C. क, अ, ड, ब
D. ड, क, अ, ब
उत्तर: B. ब, ड, क, अ
Q. पुढीलपैकी कोणत्या स्त्रियांनी चिमुर येथे बळी पडलेल्यांना भेट दिली (1942)?
अ) डॉ. (सी.) बालझकर
ब) विमला अभ्यंकर
क) रमाबाई तांबे
ड) देवस्कर
A. अ आणि ड फक्त
B. ब, आणि क फक्त
C. ब, आणि ड फक्त
D. अ, ब, क आणि ड
उत्तर: D. अ, ब, क आणि ड
Q. पूर्व गोदावरी जिल्हा, मद्रास येथे गांधीजींना पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी स्त्रियांचा एक गट आला होता. त्यापैकी ………या महिलेने ‘स्वतंत्रता संग्रामात’ उडीच घेतली.
A. श्रीमती दुर्गाबाई देशमुख
B. श्रीमती दुब्बूरी सुब्बामम्
C. श्रीमती अंबूजाम्माल
D. श्रीमती मुथूलक्ष्मी रेड्डी
उत्तर: B. श्रीमती दुब्बूरी सुब्बामम्
Q. सविनय कायदेभंग चळवळीत सोलापूर येथील कोणाला फासावर चढविले गेले?
अ) मलाप्पा धनशेट्टी
ब) श्रीकृष्ण सारडा
क) जगन्नाथ शिंदे पर्यायी उत्तरे :
ड) कुर्बान हुसेन
A. अ आणि क फक्त
B. अ आणि ब फक्त
C. अ, ब, क फक्त
D. अ, ब, क, ड
उत्तर: D. अ, ब, क, ड
Q. पहिल्या गोलमेज परिषदेला भारतातून खालीलपैकी कोणती संघटना उपस्थित राहिली होती?
A. काँग्रेस
B. स्वराज पक्ष
C. हिंदू महासभा
D. रामकृष्ण मिशन
उत्तर: C. हिंदू महासभा
Q. ब्रिटीश पंतप्रधान सर रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी आपला सुप्रसिद्ध जातीय निवाडा केव्हा जाहीर केला?
A. 14 ऑगस्ट, 1932
B. 15 ऑगस्ट, 1932
C. 16 ऑगस्ट, 1932
D. 17 ऑगस्ट 1932
उत्तर: C. 16 ऑगस्ट, 1932
Q. इंग्लंडचे पंतप्रधान…………. यांनी 16 ऑगस्ट 1932 रोजी जातीय निवाडा जाहीर केला
A. रॅम्से मॅकडोनाल्ड
B. विन्स्टन चर्चिल
C. नेव्हील चेंबरलेन
D. क्लेमेंट अॅटली
उत्तर: A. रॅम्से मॅकडोनाल्ड
Q. गोलमेज परिषदेतील निवेदनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्य समाजाला ……………..म्हणून संबोधावे असे म्हटले होते.
A. महार
B. हरिजन
C. प्रोटेस्टंट हिंदू
D. नवबौद्ध
उत्तर: C. प्रोटेस्टंट हिंदू
Q. 1931 च्या गोलमेज परिषदेनंतर “मागितली भाकरी आणि मिळाला धोंडा” असे उद्गार कोणी काढले?
A. महात्मा गांधी
B. पंडित जवाहरलाल नेहरू
C. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
D. बॅरिस्टर जीन्हा
उत्तर: A. महात्मा गांधी
Q. दांडी यात्रेनंतर महात्मा गांधींना अटक झाल्यानंतर महाराष्ट्रात………. येथे जंगल सत्याग्रह केला गेला.
A. सातारा जिल्ह्यात बिळाशी
B. पुणे जिल्ह्यात मुळशी
C. रत्नागिरी जिल्ह्यात केळशी
D. वरीलपैकी एकही नाही
उत्तर: A. सातारा जिल्ह्यात बिळाशी
Q. पुढील दोनपैकी कोणते विधान अयोग्य आहे?
अ) गांधीजींनी आपल्या मिठाच्या सत्याग्रहासाठी साबरमतीतील आपल्या आश्रमापासून गुजरात समुद्रकिनाऱ्यावरील दांडीपर्यंत यात्रा काढली ते अंतर 240 कि.मी. होते.
ब) गांधीजींच्या अनुयायांनी हे अंतर 24 दिवसात पूर्ण केले. पर्यायी उत्तरे :
A. केवळ (अ)
B. केवळ (ब)
C. दोन्ही
D. एकही नाही
उत्तर: A. केवळ (अ)
Q. ‘मिठावरील कर म्हणजे लुट व शुद्ध जुलूम आहे.’ हे विधान आपल्या पुस्तकात कोणी लिहिले?
A. रॅम्से मॅकडोनाल्ड
B. लार्ड आयर्विन
C. महात्मा गांधी
D. सरोजिनी नायडू
उत्तर: A. रॅम्से मॅकडोनाल्ड
Q. ‘जातीय निवाडा’ या नावाने इतिहासात प्रसिद्ध असलेला निवाडा रॅम्से मॅकडोनाल्ड यांनी केव्हा जाहीर केला ?
A. 16 ऑगस्ट, 1932
B. 17 ऑगस्ट, 1932
C. 18 ऑगस्ट, 1932
D. 20 ऑगस्ट, 1932
उत्तर: A. 16 ऑगस्ट, 1932
Q. 6 एप्रिल 1930 रोजी गांधीजींनी साबरमती येथे सविनय कायदेभंगाच्या चळवळीला सुरुवात केली, त्याच वेळी 6 एप्रिल 1930 ला महाराष्ट्रात………. या मुंबईच्या उपनगरात चळवळीचा आरंभ झाला.
A. वडाळा
B. वाडीबंदर
C. विले पार्ले
D. अंधेरी
उत्तर: C. विले पार्ले
Q. 1932 साली झालेल्या पुणे करारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधीजी यांच्यात कोणत्या गोष्टींवर एकमत झाले?
अ) दलितांना सरकारी नोकऱ्यांत आरक्षण
ब) दलितांसाठी स्वंतत्र मतदार संघ
क) दलितांसाठी प्रादेशिक विधिमंडळात 147 राखीव जागा
ड) केंद्रीय कायदेमंडळात दलितांसाठी 28% राखीव जागा पर्यायी उत्तरे :
A. अ आणि ब
B. फक्त क
C. क आणि ड
D. अ आणि ड
उत्तर: B. फक्त क
Q. भारतीय राष्ट्रवाद्यांचा मिठावरील कराला विरोध का होता ?
अ) मिठासारख्या जीवनाश्यक वस्तूबर कर लावणे अयोग्य होते.
ब) गरीबात गरीब लोकांनाही हा कर भरावा लागे.
क) यामुळे लोकांनी मिठाचे सेवन कमी केले असते व त्यांच्या आरोग्यावर परिणाम झाला असता.
ड) कादेमंडळातील भारतीय सदस्यांनी त्याविरुद्ध मते मांडली होती. पर्यायी उत्तरे :
A. केवळ अ
B. केवळ अ व ब
C. केवळ अ, ब ब क
D. अ, ब, क, ड सर्व
उत्तर: B. केवळ अ व ब
Q. पुढील घटना त्यांच्या कालक्रमानुसार लिहा:
अ) समाजवादी पक्षाची स्थापना
ब) काँग्रेसचे पाटणा अधिवेशन
क) श्वेतपत्रिका
ड) तिसरी गोलमेज परिषद
A. अ, ब, अ, ड
B. ड, क, ब, अ
C. अ, ड, क, ब
D. ब, अ, ड, क
उत्तर: B. ड, क, ब, अ
History Questions and Answers in Marathi
Q. मीठ कायद्याबाबत पुढील दोन विधानांपैकी कोणते चुकीचे आहे ?
अ) या कायद्याप्रमाणे राज्याला एकाधिकार होता, जरी केवळ मीठ तयार करण्यावर मीठ विकण्यावर नव्हे.
ब) महात्मा गांधी व इतरांना वाटायचे की मीठावर कर लावणे अनैतिक आहे कारण मीठ आपल्या जेवणाचा अविभाज्य घटक आहे.
A. केवळ (अ)
B. केवळ (ब)
C. न (अ) न (ब)
D. दोन्ही (अ) व (ब)
उत्तर: A. केवळ (अ)
Q. खालील दोन विधानांपैकी कोणती अयोग्य आहेत?
अ) अंबाबाई जीने उडुपी येथे परदेशी कपड्यांवर व मद्याच्या दुकानावर हल्ला केला वास्तविक महाराष्ट्रातील होत्या.
ब) महात्मा गांधी प्रथम पासूनच मीठ सत्याग्रहात स्त्रियांच्या सहभागास पूर्णपणे राजी होते.
A. केवळ अ
B. केवळ ब
C. नअनब
D. अ व ब दोन्हीही
उत्तर: D. अ व ब दोन्हीही
Q. पुढीलपैकी कोणी ‘दांडी संचलनाची’ तुलना नेपोलीयनने एल्बाहून परतल्यावर पॅरीसकडे केलेल्या संचलनाशी केली होती?
A. जवाहरलाल नेहरू
B. सुभाष चंद्र बोस
C. इंग्लीश पत्रकार
D. फ्रेंच पत्रकार
उत्तर: B. सुभाष चंद्र बोस
Q. सविनय कायदेभंगाच्या चळवळीचे उद्दिष्ठ कोणते?
A. कायदे मोडून प्रशासनाला जेरीस आणणे.
B. सरकारकडून अधिक मागण्या मान्य करून घेणे.
C. गोलमेज परिषदेत काँग्रेससाठी स्थान मिळवणे.
D. वैयक्तिक सत्याग्रह लोकप्रिय करणे.
उत्तर: A. कायदे मोडून प्रशासनाला जेरीस आणणे.
Q. गांधी-आयर्विन करारामुळे काय साध्य झाले ?
A. पूर्ण स्वराज्याच्या मागणीला मान्यता मिळाली.
B. मिठावरील कर रद्द झाला.
C. गांधीजीनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला.
D. वरीलपैकी काहीही नाही.
उत्तर: D. वरीलपैकी काहीही नाही.
Q. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे कोणत्या गोलमेज परिषदेत उपस्थित होते?
अ) पहिली गोलमेज परिषद
ब) दुसरी गोलमेज परिषद
क) तिसरी गोलमेज परिषद पर्यायी उत्तरे :
A. अ फक्त
B. अ आणि ब फक्त
C. ब आणि क फक्त
D. अ, ब, क
उत्तर: D. अ, ब, क
Q. सविनय कायदेभंग चळवळीच्या वेळी सोलापूरच्या सत्याग्रहात आघाडीवर कोण होते ?
A. जमीनदार
B. राष्ट्रीय नेते
C. गिरणी कामगार
D. व्यापारी
उत्तर: C. गिरणी कामगार
Q. घटनांचा कालानुक्रमाने क्रम लावा.
अ) स्वदेशी चळवळ
ब) खिलाफत चळवळ
क) सविनय कायदेभंग चळवळ पर्यायी उत्तरे :
ड) चलेजाव चळवळ
A. ब, अ, ड, क
B. ब, क, ड, अ
C. ड, ब, अ, क
D. अ, ब, क, ड
उत्तर: D. अ, ब, क, ड
Q. लोकमान्य टिळकांनी आपल्या चळवळीचे उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी ……..या संज्ञे ऐवजी होमरूल ही संज्ञा वापरण्याचा निर्णय घेतला.
A. स्वराज्य
B. बहिष्कार
C. स्वदेशी
D. राष्ट्रीय शिक्षण
उत्तर: A. स्वराज्य
Q. होमरूल चळवळी बद्दल पुढीलपैकी काय खरे नाही?
A. खापर्डेनी अमरावतीला होमरूल लीगची शाखा सुरू केली.
B. अमरावती होमरूल लीगचे खापर्डे अध्यक्ष होते.
C. यवतमाळ होमरूल लीगचे अध्यक्ष महादेव अणे होते.
D. नागपूरच्या परिसरात मुंजेंनी होमरूल लीगच्या शाखा स्थापन केल्या.
उत्तर: C. यवतमाळ होमरूल लीगचे अध्यक्ष महादेव अणे होते.
Q. मोरेश्वर वासुदेव अभ्यंकर हे …….. येथील होमरूलचे सक्रिय कार्यकर्ते होते.
A. मराठवाडा
B. कोकण
C. विदर्भ
D. खानदेश
उत्तर: C. विदर्भ
Q. पुढील वाक्ये सत्य आहेत का?
अ) डॉ. एनी बेझंट भारतीय राष्ट्रीय सभेच्या सदस्य होत्या.
ब) होमरुल चळवळीचा प्रचार करण्यासाठी एनी बेझंटना थिऑसॉफिकल सोसायटीचा उपयोग झाला.
पर्यायी उत्तरे :
A. अ सत्य ब सत्य नाही.
B. अ आणि ब असत्य आहेत.
C. अ आणि ब सत्य आहेत.
D. अ असत्य ब सत्य आहे.
उत्तर: C. अ आणि ब सत्य आहेत.
Q. इंडियन होमरूल सोसायटी कोणी स्थापन केली व ती कोठे होती?
A. लोकमान्य टिळक, पुणे.
B. एनी बेझंट, मद्रास.
C. लाला लाजपत राय, अमृतसर.
D. श्यामजी कृष्ण वर्मा, लंडन.
उत्तर: D. श्यामजी कृष्ण वर्मा, लंडन.
Q. पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?
अ) साऊथ इंडियन लिबरल फेडरेशन हे अॅन्टी होमरूल लीग या नावानेही ओळखले जात असे.
ब) साऊथ इंडियन लिबरल फेडरेशन ने होमरूल सध्या लागू करू नये असा अहवाल माँटेग्यूला दिला.
A. केवळ अ
B. केवळ ब
C. दोन्ही
D. एकही नाही
उत्तर: B. केवळ ब
Q. होमरूल चळवळीचा प्रसार कोणत्या वृत्ताच्या माध्यमातून झाला ?
अ) कॉमन वील
ब) न्यू इंडिया
क) हरिजन
ड) स्वराज्य
A. अ आणि ब फक्त
B. अ, ब, क फक्त
C. अ आणि ड फक्त
D. ब, क, ड फक्त
उत्तर: A. अ आणि ब फक्त
Q. बाळ गंगाधर टिळक यांनी डॉ. एनी बेझंट यांच्याबरोबर स्थापन केलेल्या होमरूल लीग बाबत काय खरे नाही?
A. तिचा उद्देश राष्ट्रीय संघटना वाढविण्याचा आणि त्यांना सशक्त करण्याचा होता.
B. ब्रिटिशांनी तिला दडपण्याचे ठरविले. वर्तमान पत्रांची मुस्कटदाबी केली.
C. मवाळांनी व मुस्लीम लीग पुढाऱ्यांनीही तिच्या कार्यक्रमात भाग घेतला.
D. वरील एकही नाही.
उत्तर: D. वरील एकही नाही.
Q. होमरूल आंदोलन (1916-18) भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाच्या ………..कालखंडात सुरू झाले.
A. क्रांतिकारी राष्ट्रवादी
B. जहालवादी
C. नेमस्तवादी
D. गांधीवादी
उत्तर: B. जहालवादी
Q. महाराष्ट्रात होमरूल लीगची चळवळ…….. यांनी सुरू केली.
A. महात्मा गांधी
B. महात्मा फुले
C. पंडित नेहरू
D. लोकमान्य टिळक
उत्तर: D. लोकमान्य टिळक
Q. सप्टेंबर 1916 मध्ये, ‘होमरूल लीग’ ची स्थापना ……… यांनी केली.
A. इंदुलाल याज्ञिक
B. जॉर्ज अरूंडेल
C. एनी बेझंट
D. गोपाळ कृष्ण गोखले
उत्तर: C. एनी बेझंट
Mpsc history questions in Marathi with answers
Q. होमरूल चळवळ प्रथम कोणत्या देशात सुरू झाली होती?
A. दक्षिण आफ्रिका
B. आयरलैंड
C. नेदरलैंड
D. भारत
उत्तर: B. आयरलैंड
Q. महाराष्ट्रातील होमरूल चळवळीचे प्रणेते होते ……….
A. एनी बेझंट
B. लोकमान्य टिळक
C. बॅरि, खापर्डे
D. डॉ. बी. एस. मुंजे
उत्तर: B. लोकमान्य टिळक
Q. ‘अहमदाबाद मिल संप’ घटना…….. यांच्याशी संबंधित होती.
A. सरदार पटेल
B. मणीभाई देसाई
C. मो. क. गांधी
D. मोरारजी देसाई
उत्तर: C. मो. क. गांधी
Q. महात्मा गांधींच्या भारतातील प्रारंभीच्या आंदोलनांचा कालक्रम लावा.
A. अहमदाबाद, चंपारण, खेडा
B. खेडा, अहमदाबाद, चंपारण
C. चंपारण, अहमदाबाद, खेडा
D. चंपारण, खेडा, अहमदाबाद
उत्तर: C. चंपारण, अहमदाबाद, खेडा
Q. साबरमती आश्रम पूर्वी अहमदाबाद जवळील……….. येथे होता. तो पूर्वीच्या जागेवरून प्लेगची साथ आल्यामुळे हालविण्यात आले.
A. कोचार्ब
B. आनंदपुरा
C. जालीसाना
D. दलोद
उत्तर: A. कोचार्ब
Q. निळीच्या उठावाची सुरुवात गोविंदपुरच्या रयतेने …………..यांच्या नेतृत्वाखाली केली.
अ) दिगंबर बिश्वास
ब) विष्णु बिश्वास
क) शिशीर कुमार बिश्वास
ड) मधुकांत बिश्वास
A. अ आणि ड फक्त
B. क आणि ड फक्त
C. अ आणि ब फक्त
D. अ, ब, क आणि ड
उत्तर: C. अ आणि ब फक्त
Q. 1915 मध्ये दक्षिण आफ्रिकेहून परत आल्यावर ‘गांधी म्हणजे स्थानिक प्रश्न हाती घेऊन त्याबद्दल ठोस पाऊले उचलणार’ अशी त्यांची ख्याती पसरली होती. पुढीलपैकी कोणते प्रश्न त्यांनी यशस्वीपणे हाताळले?
अ) फक्त चंपारण निळीच्या शेतकऱ्यांचे प्रश्न
ब) फक्त अहमदाबाद मधील कापड गिरण्यांच्या कामगारांचे प्रश्न.
क) फक्त बाडॉली शेतकऱ्यांचे प्रश्न पर्यायी उत्तरे :
A. अ आणि ब
B. ब आणि क
C. अ आणि क
D. सर्व अ, ब, क
उत्तर: A. अ आणि ब
Q. खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
अ) चंपारण्य नीळ सत्याग्रह: 1917
ब) खेडा साराबंदी चळवळ: 1918
क) जालियनवाला बाग हत्याकांड: 1919
ड) स्वराज्य पक्षाची स्थापना: 1922
वरील पर्यार्यापैकी कोणते पर्याय बरोबर आहेत?
A. अ आणि ब फक्त
B. ब आणि क फक्त
C. अ आणि क फक्त
D. वरील सर्व
उत्तर: D. वरील सर्व
Q. चंपारण्य सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले ?
A. महात्मा फुले
B. महात्मा गांधी
C. लोकमान्य टिळक
D. वि. दा. सावरकर
उत्तर: B. महात्मा गांधी
हे देखील वाचा
Leave a comment