MPSC GK One Liner Questions in Marathi
१. इंग्लंडमधील …. या तत्कालीन परंपरावादी नेत्याने १८५७ च्या उठावास ‘राष्ट्रीय उत्थान’ असे संबोधले आहे.
उत्तर: बेंझामिन डिझरायली
२. इंग्रजांपासून असलेला धोका ओळखणारा महान राज्यकर्ता म्हणून …. याचा उल्लेख करावा लागेल.
उत्तर: हैदरअली
३. इ. स. १८७० मध्ये यांनी ‘तहजीब-अल्- अखलाख’ हे वृत्तपत्र सुरू केले.
उत्तर: सय्यद अहमदखान
४. रॉबर्ट क्लाईव्हच्या दुहेरी राज्यव्यवस्थेच्या पद्धतीत शांतता व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी नवाबाकडे होती; परंतु लष्करी व दिवाणी अधिकार मात्र होते.
उत्तर: इंग्रजांकडे
५. …… याने इ. स. १८२९ मध्ये सतीच्या चालीस बंदी घालणारा कायदा संमत केला. इ. स. १८३५ मध्ये कोलकात्यास मेडिकल कॉलेज सुरू केले. ठगांचा पूर्ण बंदोबस्त करण्याचे श्रेयही त्यासच द्यावे लागते.
उत्तर: लॉर्ड विल्यम बेंटिंक
६. इ. स. १८५७ च्या उठावातील एक नेतृत्व तात्या टोपे यांचा यांनी ‘पराभूत शिवाजी’ असा उल्लेख करून एक प्रकारे त्यांचा गौरवच केला. –
उत्तर: वि. दा. सावरकर
७. ‘विद्यार्थी, शेतकरी व मध्यमवर्गीयांचा उठाव’ या शब्दांत १८५७ च्या उठावाचे वर्णन कोणी केले आहे?
उत्तर: डॉ. अंबिका प्रसाद
८. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने सन १८८८ मध्ये इंग्लंडमध्येही आपली शाखा सुरू केली. काँग्रेसच्या या शाखेचे नेतृत्व कोणाकडे होते ?
उत्तर: विल्यम डिग्बी
९. कोणत्या कायद्याची संभावना पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ‘मजबूत ब्रेक असलेले पण इंजिन नसलेले यंत्र’ या शब्दांत केली आहे?
उत्तर: १९३५ चा भारत सरकारचा कायदा
१०. इ. स. १९१९ मध्ये लोकमान्य टिळकांनी नव्या मार्गाची घोषणा केली होती. या
उत्तर: प्रतियोगिता सहकार
11. काग्रेस पक्षाचा पाया विस्तृत करण्याच्या दृष्टीने किंबहुना, काँग्रेस पक्षास जन-सामान्यांच्या पक्षाचे स्वरूप देण्याच्या दृष्टीने….. मध्ये काँग्रेस पक्षात प्रथमच संघटनात्मक बदल केले गेले.
उत्तर: इ. स. १९२०
१२. गांधीजींनी तथाकथित अनुसूचित जातीसाठी ‘हरिजन’ या शब्दाचा वापर कोणत्या वर्षी पहिल्यांदाच केला?
उत्तर: इ. स. १९३२
१३. दुसऱ्या बाजीरावाचे दत्तकपुत्र व १८५७ च्या उठावाचे एक नेते नानासाहेब पेशवे यांचे वास्तव्य कोठे होते ?
उत्तर: बिठूर (कानपूर)
१४. ऑक्टोबर, १९४० मध्ये सुरू करण्यात आलेल्या वैयक्तिक सत्याग्रहाच्या चळवळीतील पहिले सत्याग्रही आचार्य विनोबा भावे यांनी आपल्या वैयक्तिक सत्याग्रहास …… येथून प्रारंभ केला?
उत्तर: पवनार (वर्धा)
१५. अयोध्येच्या नवाबाची पत्नी बेगम हजरतमहल हिने तेथील उठावाची सूत्रे आपल्या हाती घेतली. तिचा मुलगा …. यास लखनौचा नवाब घोषित केले गेले,
उत्तर: बिरजिस कादीर
१६. मुंबईमध्ये नारायण मेघाजी लोखंडे यांनी इ. स. १८८४ मध्ये गिरणी कामगारांची संघटना स्थापन करण्यापूर्वी इ. स. १८७० मध्ये बंगालमधील …. या सुधारकाने एक ‘कामगार मंडळ’ स्थापन करून ‘भारत श्रमजीवी’ हे मासिकही सुरू केले होते.
उत्तर: शशिपाद बॅनर्जी
१७. उत्तर प्रदेशातील शेतकरी चळवळीच्या दरम्यान हे मूळचे महाराष्ट्रीय गृहस्थ अवधमधील शेतकऱ्यांचे नेते म्हणून पुढे आले. शेतकरी चळवळीचा केंद्रबिंदू बनले.
उत्तर: बाबा रामचंद्र
१८. राष्ट्रीय काँग्रेसने व खिलाफत नेत्यांनी इ. स. १९२० च्या दशकात उत्तर भारतात सुरू केलेली शेतकऱ्यांची चळवळ कोणत्या नावाने ओळखली जाई ?
उत्तर: एका चळवळ
१९. इ. स. १९२८ मध्ये गुजरातमधील सुरत जिल्ह्यातील बाडर्डोली तालुक्यात करबंदीची चळवळ सुरू झाली. या चळवळीचे नेतृत्व कोणी केले ?
उत्तर: सरदार वल्लभभाई पटेल
२०. जगाच्या इतिहासात सत्याग्रहाचे शस्त्र पहिल्यांदाच वापरले गेले ते दक्षिण आफ्रिकेमध्ये. कोणत्या वर्षी ?
उत्तर: इ. स. १९०६
२१. राष्ट्राय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर यांनी आपल्या … या पुस्तिकेत संघाच्या सिद्धान्ताचे विवरण केले आहे.
उत्तर: ‘वुई’
२२. १ जानेवारी, १९२३ रोजी अलाहाबाद (सध्याचे नाव प्रयागराज) येथे ‘काँग्रेस-खिलाफत स्वराज्य पक्षा’ची स्थापना करण्यात आली. चित्तरंजनदास हे या पक्षाचे अध्यक्ष होते; तर …. हे पक्षाचे सचिव होते.
उत्तर: मोतीलाल नेहरू
२३. सत्याग्रहाचे वर्णन निष्क्रिय प्रतिकार किंवा करता येईल. असेही
उत्तर: सविनय कायदेभंग
२४. दक्षिण आफ्रिकेतील आंदोलनादरम्यान गांधीजींनी तेथील भारतीयांमधील तुरुंगवासाचे भय पूर्णतः नष्ट केले; इतके की लोक तुरुंगाला …. असे संबोधू लागले.
उत्तर: किंग एडवर्डज् हॉटेल
२५. ‘पराक्रमी वीर पुरुष व हुतात्मा यांच्या मुशीत घडलेले व्यक्तिमत्त्व’ या शब्दांत नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांनी यांचे वर्णन केले आहे.
उत्तर: महात्मा गांधी
२६. “आपल्या सभोवतालच्या लोकांना नेता व हुतात्मा बनविण्याचे आश्चर्यकारक आध्यात्मिक सामर्थ्य त्यांच्याकडे आहे,” या शब्दांत महात्मा गांधी यांचे वर्णन कोणी केले आहे ?
उत्तर: नामदार गोपाळ कृष्ण गोखले
२७. तात्पुरता तह किंवा तात्पुरता समेट या शब्दांत ज्या कराराचे वर्णन केले जाते तो ‘गांधी-आयर्विन करार’ संपन्न झाला
उत्तर: ५ मार्च, १९३१
२८. गांधीजींच्या सविनय कायदेभंगाच्या संकल्पनेवर यांच्या विचारांची छाप असल्याचे दिसून येते.
उत्तर: हेन्री थोरो
२९. इ. स. १९६० मधील सिंधू पाणी करारानुसार रावी, बियास व सतलज या सिंधूच्या उपनद्यांचे पाणी भारताच्या वाट्याला आले; तर नद्यांचे पाणी पाकिस्तानास मिळाले.
उत्तर: सिंधू, झेलम व चिनाब
३०. ३० जानेवारी, १९४८ रोजी गांधीजींची शेवटची मुलाखत घेणारी व्यक्ती
उत्तर: मागरिट बोर्क-व्हाईट
३१. ‘मिशन वुईथ माऊंटबॅटन’ या पुस्तकाचे कर्ते
उत्तर: कॅम्पबेल जॉन्स
३२. ……….. हे गांधीजींचे अपुरे राहिलेले आत्मचरित्र होय.
उत्तर: माय एक्स्पेरिमेंट्स वुईथ टुथ
३३. फेब्रुवारी, १९२७ मध्ये ब्रुसेल्स येथे भरलेल्या साम्राज्य- वादविरोधी आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये काँग्रेसचे प्रतिनिधित्व कोणी केले होते?
उत्तर: पंडित जवाहरलाल नेहरू
३४. ‘इ. स. १९२८ मध्ये …. या विधेयकावर सरकारचा झालेला पराभव हे स्वराज्यपक्षीयांनी कायदेमंडळात प्रवेश करून मिळविलेले मोठे यश म्हणावे लागेल.
उत्तर: सार्वजनिक सुरक्षा
३५. “खरे क्रांतिकारी सैन्य खेड्यांत आणि कारखान्यांत आढळते,” फाशी जाण्यापूर्वी या अर्थाचे मत कोणी व्यक्त केले होते?
उत्तर: भगतसिंग
३६. “भांडवलशाही आणि वर्गवर्चस्व यांचा शेवट म्हणजे समाजवाद,” या शब्दांत समाजवादाची व्याख्या करणारा क्रांतिकारक
उत्तर: भगतसिंग
३७. भगवतिचरण वर्मा, चंद्रशेखर आझाद आणि यशपाल यांनी लिहिलेल्या या ग्रंथात “सामाजिक, आर्थिक व राजकीय स्वातंत्र्य म्हणजे क्रांती,” अशी क्रांतीची व्याख्या करण्यात आली आहे.
उत्तर: ‘फिलॉसॉफी ऑफ दी बॉम्ब’
३८. ‘अखिल भारतीय किसान सभा’ कोणी स्थापन केली होती ?
उत्तर: स्वामी श्रद्धानंद
३९. …. यांनी इ. स. १९८३ मध्ये दिल्ली येथे भरलेल्या अलिप्त राष्ट्र चळवळीचे अध्यक्षपद भूषविले होते.
उत्तर: इंदिरा गांधी
४०. इ. स. १९६२-६३ मधील काँग्रेसविरोधी वातावरण लक्षात घेऊन सरकारमधील काँग्रेस नेत्यांनी अधिकारपदे सोडून जनतेत जाऊन कार्य करावे व पक्षाची प्रतिमा उजळ करावी, अशा अर्थाची एक योजना आखली गेली होती. ती योजना तिच्या निर्मात्याच्या नावानुसार म्हणून ओळखली जाते.
उत्तर: कामराज योजना
४१. ‘कृतीतून शिक्षण’ या उद्देशाने गांधीजींनी…. ही शिक्षण योजना मांडली.
उत्तर: वर्धा योजना
४२. इंग्रजांनी आपली पहिली वखार सुरत येथे स्थापन केली. इ. स….. पर्यंत सुरत हे ब्रिटिशांचे भारतातील व्यापारी केंद्र होते.
उत्तर: १६८७
४३. फ्रेंचांनी भारतातील आपली वसाहत पाँडेचरी (पुदुच्चेरी) येथे स्थापन केली. पुढे सन…. पर्यंत पाँडेचरी (पुदुच्चेरी) फ्रेंचांच्या अमलाखाली राहिले.
उत्तर: १९५१
४४. “इतकी भ्रष्ट राजवट जगाच्या पाठीवर कोठेही झाली नसेल,” रॉबर्ट क्लाईव्हच्या बंगालमधील दुहेरी राज्यव्यवस्थेच्या संदर्भात हे उद्गार काढले
उत्तर: सर जॉर्ज कॉर्नवाल
४५. “२३ जून, १७५७ रोजी भारतातील मध्य युगाचा अस्त होऊन अर्वाचीन युगाचा प्रारंभ झाला.” हे उद्गार कोणाचे ?
उत्तर: सर जदुनाथ सरकार
Leave a comment